तुमची जमीन कसण्यासाठी नरेंद्र मोदी येणार नाहीत, शरद पवारांचा नरेंद्र मोदींना मिश्किल टोला….
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | INDAPUR | NATIONALIST CONGRESS PRESIDENT SHARAD PAWAR | PRIME MINISTER NARENDRA MODI | SHARAD PAWAR'S OPEN COMMUNICATION WITH FARMERS | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
महाराष्ट्रात मान्सूनने हजेरी लावली असली तरी राज्यात पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. याविषयी सरकारशी चर्चा करणार आहे. मात्र जमीन कसायची सोडू नका, तुमची जमीन कसण्यासाठी नरेंद्र मोदी येणार नाहीत, असा मिश्किल टोला लगावत काहीही करून सरकार बदलायचे आहे. असे शरद पवार यांनी म्हटले आहे. त्यांनी आज इंदापूरमधील शेतकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला होता यावेळी ते बोलत होते.
स्त्रोत सोशल मिडिया
शरद पवारांचा दुष्काळ पाहणी दौरा….
शरद पवारांचा दुष्काळ पाहणी दौरा सुरू आहे. लोकसभेपाठोपाठ विधानसभेसाठी पवारांकडून दुबार पेरणीची सुरुवात करण्यात येत आहे. य़ावळे शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले सरकारला अनुदान द्यावेच लागेल. नाही दिले तर रस्त्यावर उतरावच लागेल. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मी रस्त्यावर उतरायला तयार आहे. नाहीतर ४-५ महिने थांबा कारण मला सरकार बदलायचे आहे. निर्णय घेण्याचे अधिकार तुमच्या हातात द्यायचे आहेत. त्यासाठी तुमची साथ हवी आहे असे म्हणत त्यांनी शेतकऱ्यांचे लोकसभेला साथ दिल्याबद्दल आभार मानले आहेत.