मुस्लिमांचं लक्ष सानिया मिर्झाच्या स्कर्टवर, म्हणत मोदी आणि योगींवर देखील नसरुद्दिन शाहने परखड मत व्यक्त केले.
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | BOLLYWOOD | NASRUDDIN SHAH | PRIME MINISTER NARENDRA MODI | UTTAR PRADESH CHIEF MINISTER YOGI ADITYANATH | MUSLIM COMMUNITY NEWS | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह हे त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर ते मोकळेपणे मत व्यक्त करत असतात. मात्र यामुळे अनेकदा त्यांना ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यावर व्यक्त झाले आहेत. नसीरुद्दीन शाह म्हणाले की नरेंद्र मोदी असे पहिले नेते नाहीत जे मुस्लिमांविरोधात बोलत असतील. हे आधीपासूनच चालत आलं आहे. तर दुसरीकडे त्यांनी मुस्लिमांच्याही काही चुका बोलून दाखवल्या. मुस्लिमांचं लक्ष नेहमी चुकीच्या गोष्टींवर असतं. ते शिक्षणाऐवजी सानिया मिर्झाच्या स्कर्टच्या लांबीकडे अधिक लक्ष देतात. चूक मुस्लिमांची आहे आणि त्यांनी आता डोळे उघडले पाहिजेत असं परखड मत नसरुद्धीन शाहानी मांडलं आहे. या मुलाखतीत ते लोकसभा निवडणुकांचा निकाल आणि हिंदू-मुस्लिम राजकारणावरही बोलले आहेत.
स्त्रोत.सोशल मिडिया.
मोदी खूप चलाख आहेत की त्यांनी हिंदू-मुस्लिम या विषयाला छेडलं आहे.
‘द वायर’ ला दिलेल्या मुलाखतीत नसरुद्धीन शाह म्हणाले आपण सर्वांनी हा विचार करायला हवा की गोष्टी कशा ठीक होऊ शकतात. आपल्या सर्वांसाठी मोदींना विरोध करणं खूप सोपं आहे. देशात जे काही चुकीचं घडतंय त्यासाठी मोदींना दोष देणं सोपं आहे. पण सत्य हे आहे की मोदी सत्तेत येण्याच्या आधीपासूनच देशात बरंच काही वाईट घडतंय. मोदींनी फक्त त्या चुकीच्या गोष्टींना स्पर्श केला आहे. ज्या खूप आधीपासूनच दडलेल्या होत्या. मला आठवतंय की लहानपणी मला मुस्लीम असल्याने टोमणा मारला जायचा. त्यावेळी मीसुद्धा दुसऱ्या धर्मावर टिप्पणी करायचो. माझ्या मते या गोष्टी खूप आधीपासूनच आहेत. मोदी खूप चलाख आहेत की त्यांनी या गोष्टींना पुन्हा छेडलं आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
योगी आदित्यनाथ आजसुद्धा म्हणतात की हिंदू-मुस्लीम एकत्र राहू शकत नाही.
मुलाखतीत त्यांनी मुस्लिमांच्या चुका सांगितल्या. सत्य हेच आहे की मुस्लीमसुद्धा पवित्र-स्वच्छ नाहीत. मुस्लिमांनी नेहमीच चुकीच्या गोष्टींकडे लक्ष दिल आहे. त्यांनी हिजाब, सानिया मिर्झाच्या स्कर्टची लांबी या गोष्टींवर लक्ष केंद्रीत केलं आहे. खरंतर त्यांनी शिक्षण आणि आपल्या समुदायाचं ज्ञान कसं वाढवता येईल, याकडे लक्ष द्यायला हवं होतं. जेव्हा मॉडर्न गोष्टी शिकवायच्या होत्या, तेव्हा मदरसांमध्ये ढकलण्याचं काम केलं. आता पुरे झालं मुस्लिमांनी आता तरी डोळे उघडायला हवेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. मुस्लिमविरोधी टिप्पण्यांवर नसीरुद्दीन पुढे म्हणाले, असं करणारे ते काही पहिले नेते नाहीत. ते फक्त मोक्याच्या क्षणी आले. मुस्लीम लीगच्या उत्तरात हिंदू महासभा १९१५ साली बनली होती. दोन बंगाली लोकांनी, मला त्यांची नावं आठवत नाहीत, पण त्यांनी २ नेशन थिअरीबद्दल बोलण्यास सुरुवात केली होती. मोदी हे एका परंपरेवर चालत आहेत जी बऱ्याच नेत्यांनी याआधी सुरू केली होती. योगी आदित्यनाथ आजसुद्धा म्हणतात की हिंदू-मुस्लीम एकत्र राहू शकत नाही.