TIMES OF AHMEDNAGAR
मी राष्ट्रवादी पार्टी हे नाव आणि उगवता सूर्य हे चिन्ह मिळावं अशी मागणी शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात केली जाऊ शकते. शरद पवार गटाने चार चिन्ह निश्चित केल्याची देखील माहिती मिळत आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तर आमचा पक्ष आणि चिन्ह शरद पवार असल्याचं ट्वीट निवडणूक आयोगाच्या निकालानंतर केलं आहे.
शरद पवारांचा व्हिडीओ २०२२ चा
NCPspeaks या ( x ) जुने ट्विटर सोशल मिडियावर शरद पवार यांचा जो व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे तो व्हीडीओ २०२२ मधला आहे. वय झालं अशी टीका त्यावेळी शरद पवारांवर विरोधकांनी केली होती. ज्यानंतर उत्तर म्हणून हे भाषण शरद पवार यांनी दिलं होतं. त्यात मी थकणार नाही अस म्हटलं होतं. अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडल्यानंतर अजित पवार यांनीही शरद पवार यांचं वय झाल्याचा मुद्दा मांडला होता. त्यानंतर शरद पवार यांनीही अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. आता निवडणूक आयोगाचा निकाल आल्यानंतर दोन वर्षांपूर्वीचा व्हिडीओ पोस्ट करत राष्ट्रवादीने भावनिक आवाहन केलं आहे.
कुणाला सांगताय म्हातारा झालो, तुम्हाला काय ठाऊक आहे ? तुमची साथ आहे तोपर्यंत हे गाडं थकणार नाही, थांबणार नाही. शरद पवारांनी २०२२ मध्ये एक भाषण केलं होतं. त्या भाषणातला व्हिडीओ पोस्ट करुन राष्ट्रवादी काँग्रेसने हा व्हिडीओ NCPspeaks वर शेअर केला आहे. आज निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचा आहे असा निर्णय दिला. तसंच घड्याळ हे चिन्हही अजित पवारांनाच दिलं आहे. त्यानंतर शरद पवार गटाकडून भावनिक साद घालण्यात आली आहे.
NCPspeaks ने कोणता व्हिडीओ पोस्ट केला ?
शरद पवार या व्हिडीओत म्हणाले होते मी आता ८०-८२ वर्षाचा झालोय असं सांगता, कुणाला सांगताय म्हातारा झालोय. तुम्हाला काय ठाऊक आहे अजून. तुम्ही काय त्याच्या खोलात जाऊन पाहिलंय. जोपर्यंत तुम्हा लोकांची साथ आहे, तोपर्यंत हे गाडं थकणार नाही, थांबणार नाही. त्यानंतर NCPspeaks म्हटलंय की २०२२ च्या व्हिडिओत साहेबांचं जे म्हणणं आहे ते आजही तंतोतंत तसंच आहे. कारण, त्यानंतर अनेक राजकीय वादळं आली तरीही हा मनुष्य खचत नाही साहेबांची इच्छाशक्ती अजूनही प्रचंड आहे. कोणत्याही संकटाला ते आजही निधड्या छातीने सामोरं जातात म्हणूनच ते आमचे साहेब आहेत.
अजित पवारांचे संख्याबळ ?
राज्यसभा १ खासदार
महाराष्ट्र- ४१ आमदार
महाराष्ट्र विधान परिषद- ५ आमदार
नागालँड-७ आमदार
झारखंड-१ आमदार
शरद पवारांचे संख्याबळ ?
लोकसभा खासदार-४
राज्यसभा ३
महाराष्ट्र -१५ आमदार
महाराष्ट्र विधान परिषद – ४ आमदार
केरळ -१ आमदार