लोकसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर एनडीए की इंडिया आघाडी ? यावर बरीच चर्चा पाहायला मिळत आहे. अखेर एनडीएकडे स्पष्ट बहुमत असताना इंडिया आघाडीनं ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घ्यायचं जाहीर केलं आहे.काल (दी.६ जून) नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे दिला आणि ९ जून रोजी पुन्हा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याचंही निश्चित झालं आहे. पण आता केंद्रातील मंत्रीपदांसाठीची चढाओढ पाहायला मिळण्याची शक्यता आहे. २०१४ आणि २०१९ प्रमाणे भाजपाला स्वबळावर बहुमताचा आकडा पार करता आलेला नाही. त्यामुळे एनडीएतील मित्रपक्षांवर भिस्त ठेवूनच मोदींच्या तिसऱ्या टर्मचा कारभार चालणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर नितीश कुमार तीन मंत्रीपदांची मागणी करणार असल्याचं बोलले जात आहे.

चंद्रबाबू नायडू और नीतीश कुमार होने का महत्व - द वीकस्त्रोत.सोशल मिडिया.

दोन्ही बाबूंची किंमत वाढली.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अवघ्या २४० जागांपर्यंत मजल मारता आली आहे. त्यामुळे पक्षाला यंदा तब्बल ६३ जागांचा फटका बसला आहे. त्यामुळे एनडीएमध्ये भाजपाची मोठी पीछेहाट झालेली असताना चंद्रबाबू नायडूंचा तेलगु देसम पक्ष आघाडीतील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. तेलगु देसम पक्षाचे १६ खासदार निवडून आले आहेत. आघाडीत तिसऱ्या क्रमांकावर नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलानं १२ खासदारांसह आपलं महत्त्व अधोरेखित केलं आहे. त्यामुळे आता मंत्रीपदांच्या वाटपात इतर मित्रपक्षांना भाजप किती आणि कोणती खाती देणार ? याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

नितीश कुमारांना केंद्रात फक्त एक मंत्रीपद देण्यात आलं होतं. आता बाजू बदलली.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नरेंद्र मोदी व  एनडीएला पूर्ण समर्थन असल्याचं स्पष्ट केलं आहे. २०१९ च्या निवडणुकीत नितीश कुमार यांचे १६ खासदार निवडून आले होते. त्यावेळी त्यांना केंद्रात फक्त एक मंत्रीपद देण्यात आलं होतं. यंदा मात्र परिस्थिती वेगळी आहे. यावेळी नितीश कुमार यांच्या जागा ४ ने घटून १२ वर आल्या आहेत. पण भाजपाला स्वबळावर बहुमत न मिळाल्यामुळे आता नितीश कुमार एकऐवजी तीन मंत्रीपदांसाठी आग्रही असतील, अशी माहिती समोर आली आहे. येत्या ८ किंवा ९ जून रोजी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता असल्याची माहिती राजकीय सूत्रांनी दिली आहे.

PM मोदी के गढ़ में नीतीश की रैली रद्द, अब जानें जेडीयू का क्या है प्लान B?  | Nitish Kumar Varanasi Rohaniya Rally Cancelled Lok Sabha Election 2024 PM Narendra  Modi | TV9 Bharatvarshस्त्रोत.सोशल मिडिया.

बिहारमधील पाण्याचा प्रश्न पाहता जलशक्ती खातं महत्त्वाचं आहे.

नितीश कुमार रेल्वे, ग्रामविकास आणि जलशक्ती या तीन मंत्रालयांसाठी आग्रही असण्याची शक्यता आहे. जर या तीन मंत्रालयांवर घासाघीस झाली तर वाहतूक आणि कृषी या खात्यांचे पर्याय दिले जातील. नितीश कुमार यांनी पहिली तीन खाती याआधी एनडीएच्या सरकारमध्ये हाताळली आहेत. बिहारच्या विकासासाठी फायदेशीर ठरतील अशी खाती आमच्या मंत्र्यांनी सांभाळावीत, यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. बिहारमधील पाण्याचा प्रश्न पाहता जलशक्ती खातं महत्त्वाचं आहे असं पक्षातील एका नेत्यानं सांगितल्याची महिती मिळाली आहे.