नगर : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार तथा माजी आमदार नीलेश लंके यांच्याकडे जंगम व स्थावर अशी एकूण ४२ लाख ५४ हजार ४३६.५२ रुपयांची मालमत्ता आहे. त्यांची पत्नी राणी लंके यांच्या नावावर केवळ २ लाख ७८ हजार २८४.३५ रुपये किंमतीची जंगम मालमत्ता आहे. तर मुले तेजस व शिवम या दोघांच्या नावावर अनुक्रमे ११ हजार ५६९ व १० हजार २७१ रुपये आहे. संपूर्ण लंके कुटुंबाकडे ३५ लाख ५४ हजार ५६१.६७ रुपयांची संपत्ती आहे.