TIMES OF AHMEDNAGAR
अहमदनगर शहरात अवजड वाहनांच्या प्रवेशाने नागरिक वैतागले आहेत. अवजड वाहनांचे शहरातले प्रवेशाचे प्रमाण जास्तच वाढत आहे. मात्र पोलीस हे फक्त चिरीमिरी घेऊन बघ्याच्या भूमिकेत असल्याने सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. अवजड वाहनांनी शहरात प्रवेश करू नये यासाठी बाह्यवळण रस्त्याच्या प्रवेशावर पोलिसांचे बळ तैनात करण्यात आले आहे. मात्र हि अवजड वाहने तरीदेखील शहरात दाखल होत आहेत.
स्त्रोत.सोशल मिडिया.
खाकीत वसुलीवले !
खाकी हि जनतेच्या सेवेसाठी आहे. मात्र शहरातली काही खाकि हि जनतेच्या सेवेसाठी नसून सर्वसामान्य जनतेकडून वसुली करण्यासाठी असल्याचे पोलिसांच्या वसुलीतून एकंदरीत स्पष्ट होते. केडगाव बायपासला अवजड वाहनांची मोठी लुट सुरु आहे. खाकी घालून जनतेला लुटणाऱ्यांवर प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नसल्याने प्रशासन झोपेत आहे कि काय असा मुख्य सवाल उपस्थित होत आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
फक्त बायपास नाही रिक्षावाल्यांकडून देखील वसुली.
“पे” करा दाम आणि चालुद्या तुमच काम या मिशनमध्ये अनेकांना मोठी संधी मिळाली आहे. शहरात अवैध वाहनांवर कारवाई न करण्यासाठी शहरात काही लोकांची नेमणूक असल्याची प्राथमिक माहिती आहे.ऑटोरिक्षामध्ये प्रवाशांची संख्या नियमानुसार ठरलेली आहे. मात्र महागाईच्या चटक्यामुळे रिक्षा चालक मर्यादेपेक्षा जास्त प्रवाशी बसवत असतात. या रिक्षाचालकांकडून देखील कारवाई न करण्याचे पाकीट घेतले जाते. दौंड रोड, पुणे रोड , रेल्वेस्टेशन या भागात सत्या तर मनमाड रोड, संभाजीनगर रोड , एमआयडीसी परिसर या भागात अप्पा , भिंगारला वैशा असे अनेक लोकं तैनात आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र या सर्व प्रकारावर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम काही कारवाई करतील कि जैसे थे च्या भूमिकेत असतील हे पाहणे महत्वाचे ठरेल.