Reading:केंद्र, राज्य व स्थानिक पोलिस अशी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात,जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक यांची करडी नजर असतांना देखील,ईव्हीएम मशीन भोवती लंके समर्थक तैनात.
केंद्र, राज्य व स्थानिक पोलिस अशी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात,जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक यांची करडी नजर असतांना देखील,ईव्हीएम मशीन भोवती लंके समर्थक तैनात.
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | LOK SABHA ELECTION | SOUTH LOK SABHA CONSTITUENCY | NILESH LANKA | SUJAY VIKHE AHMEDNAGAR MIDC STRONG ROOM | COLLECTOR SIDDHARAM SALIMATH | DISTRICT SUPERINTENDENT OF POLICE RAKESH OLA | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
नगर : बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान झाल्यानंतर ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रूमच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला होता. यावरून खासदार. सुप्रिया सुळे यांनी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने नगरमध्ये सावध भूमिका घेतली आहे. ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूम बाहेर चोवीस तास पहारा देण्याचे काम कार्यकर्त्यांनी सुरू केले आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
नीलेश लंके यांचे प्रतिनिधी स्ट्राँग रूमबाहेर तंबू ठोकून चोवीस तास पहारा देत आहेत.
नगर, शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी सोमवार (१३ मे) रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. यानंतर मंगळवारी ३ हजार ७३४ मतदान यंत्रे अहमदनगर एमआयडीसीतील वखार महामंडळात सीलबंद करण्यात आले. या गोदामाभोवती केंद्र, राज्य व स्थानिक पोलिस अशी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ आणि पोलिस अधीक्षक राकेश ओला हे चोवीस तासांतून दोन वेळा ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रूमला भेट देत आहेत. या परिसरातील वाहतूक देखील दुसऱ्या मार्गाने वळवली जात आहे. तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांचे प्रतिनिधी स्ट्राँग रूमबाहेर तंबू ठोकून चोवीस तास पहारा देत आहेत. त्यांच्यासाठी निवडणूक विभागाने सीसीटीव्ही फुटेजचे स्क्रीन उपलब्ध करून दिले आहे.