भाजपमध्ये स्पष्ट आणि बिनधास्त नेते म्हणून आपली झाप सोडणारे एकमेव नेते म्हणून नितीन गडकरी यांना ओळखले जाते. मत द्यायचे तर तर द्या,नाहीतर मला काही गरज नाही म्हणाऱ्या गडकरींना सत्तेची लालच नसल्याचे बोलले जाते. पार्ल्याच्या लोकमान्य सेवा संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी बिनधास्त मते मांडली. तसेच सध्याच्या राजकारणावरही त्यांनी परखड मते मांडत राजकारण्यांना कानपिचक्याही दिल्या.
पुढे गडकरी म्हणाले की मला सात डॉक्टरेट मिळाल्या आहेत. पण मी नावापुढे कधीच डॉक्टर लावत नाही. मी दहावीला होतो. तेव्हा एमर्जन्सी लागली.एमर्जन्सीच्या आंदोलनात मी होतो. त्यात माझ वर्ष गेलं. मला दहावीत ५२ टक्के मार्क मिळाले. सायन्समध्ये ४९ टक्के मिळाले. माझ्या बहिणीचे मिस्टर सायंटिस्ट होते. आमच्या घरीही शिकलेली मंडळी होती. त्यावेळी माझी लाईन ठिक नाही असं घरच्यांना वाटायचं. तेव्हा मी नोकरी मागणारा नाही तर नोकरी देणारा होईल, असं सांगायचो. तेव्हा घरचे हसायचे. आपल्याकडे बँकेत किंवा शिक्षकाची नोकरी करतात. परमेश्वराने ब्राह्मणांवर खूप मोठे उपकार केले. त्यांना कोणत्याही प्रकारचं आरक्षण नाही. त्यामुळे ते वडापावचं दुकान टाकत आहेत. सलून टाकत आहे. पुण्यातील प्रत्येक घरातील मुलगा अमेरिकेत गेलाय, असं नितीन गडकरी म्हणाले.