नगर : परिचारीका दिनाचे औचित्य साधून उपदेशक व बुथ हॉस्पिटल अ.नगर यांच्या संयुक्त विद्यमाने परिचारीका गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम शर्लि मिलर हॉल बुथ हॉस्पिटल या ठिकाणी संपन्न झाला. सदर कार्यक्रमात महाराष्ट्रातून पन्नासहून अधिक परिचारीकांना परिचारीका गौरव पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती सुशिला श्री सुंदर संभाजीनगर या होत्या. व उद्घाटक बुथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे हे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये मेजर ज्योती कळकुंबे, सौ. दिक्षा घाटविसावे, मेजर रविंद्र शेलार, ज्योती लोंढे, सौ. छाया जाधव, सौ.टि.टि. पॉल जाधव, सौ. सलोमी जाधव, सौ. मल्लीका साबळे, प्रा. प्रतुल कसोटे, प्रा. गायकवाड मॅडम, कॅप्टन डॅनिसन परमार आदि मान्यवर उपस्थीत होतेकार्यक्रमाची सुरूवात प्रार्थनेने व दिप प्रज्वलन करून झाली. प्रास्ताविक श्री जॉर्ज क्षेत्रे यांनी केले. सर्व मान्यवरांनी परिचारीका दिनानिमित्त मोलाचे मार्गदर्शन करून पुरस्कार प्राप्त परिचारीकेंना शुभेच्छा दिल्या व उपदेशकाच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी बुथ हॉस्पिटल नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थीनींनी गित व नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कुमारी स्नेहल सुर्यवंशी यांनी केले. तर आभार विक्रम गायकवाड यांनी मानले. शेवटची प्रार्थना प्रकाश लोखंडे यांनी केली. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता प्रवीण साबळे, शितल शिंदे, जयमाला केदारी, कविता गायकवाड आदिंनी परिश्रम घेतले.