राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात सभागृहात एकमेकांविरूद्ध झाले चांगलेच आक्रमक….
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | ASSEMBLY | REVENUE MINISTER RADHAKRISHNA VIKHE | BALASAHEB THORAT | RADHAKRISHNA VIKHE HAS PUBLICLY ADMITTED THAT HE CANNOT DO ANYTHING ABOUT THE SAND MAFIA AND THORAT HAS ALSO BEEN ACCUSED | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील विधानसभेत वाळू माफिया, वाळूचोरी यावर बोलत होते. त्यांनी यावेळी आपण थांबवू शकत नाहीत अशी थेट कबुली देत वाळू माफियांसमोर हात टेकल्याची परिस्थिती आहे. तसेच, आपण वाळू माफिया किंवा वाळू चोरी यावर काही बंधन घालण्यापेक्षा त्याला मोकळीक द्यावी असे सभागृहाला सुचवले आहे. वाळू माफियांबद्दल आपण काहीच करू शकत नाहीत अशी जाहीर कबूली स्वत: महसूलमंत्र्यांनीच दिल्याने सर्वचजण अवाक झाले आहेत.
स्त्रोत सोशल मिडिया
वाळू माफियांबद्दल आपण काहीच करू शकत नाहीत – राधाकृष्ण विखे
सभागृहातील सर्वच पक्षाच्या लोकांचे लागेबांधे आहेत अशी जाहीर कबूली देत वाळू चोरीतील चक्रच आहे ते त्यांनी स्पष्ट केले आहे. वाळू चोरीवर काही कारवाई करण्याची वेळ आली की अनेक जणांचे फोन येतात. त्यामध्ये ते आपले आहेत. आपल्या जवळचा आहे असे सांगितले जाते त्यामुळे कारवाई होत नाही अशी थेट कबुलीच विखे पाटलांनी यावेळी दिली आहे. तसेच सर्वच राजकीय पक्ष वाळूच्या व्यवसायात आहेत त्यामुळे यावर जास्त बोलता येत नाही आणि हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे मी काय इथे यादी वाचून दाखवू का ? असेही ते म्हणाले आहेत. यावर विरोधकही मोठे आक्रमक झाल्याचे दिसले आहे. काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी वाळू धोरण फसले असून मंत्री महोदयांनी याबद्दल जाहीर कबुली दिली आहे असा थेट आरोप करत तुम्ही ६०० रुपयात कशी वाळू देणार आहात हे एकदा स्पष्ट करा असा प्रश्नही उपस्थित केला आहे. तसेच जर ट्रक पकडला तर २ लाख रुपये दंड होत असेल तर तो कशातून भरणार असे म्हणत यामध्ये मोठ्या प्रमाणत टोळ्या तयार झाल्या आहेत असेही त्या यावेळी म्हणाल्या आहेत.
स्त्रोत सोशल मिडिया
राधाकृष्ण विखे यांनी थोरातांवर केले आरोप…..
बाळासाहेब थोरातही मोठ्या प्रमाणात वाळू प्रकरणावर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांना मारतात. त्यानंतरही वाळू चोरी करणाऱ्यांना पाठिशी घातले जाते असा थेट आरोप थोरातांनी केला आहे. तसेच, सरकारकडून, मंत्रालयातून सुचना जातात की गुंडांवर कारवाई करू नका असा थेट घणाघात बाळासाहेबांनी केला आहे. तसेच, नवा प्रश्न उपस्थित केला आहे. ग्रामपंचायताला, नगर परिषदेला वाळू वितरणाची परवानगी द्यायची हे गंभीर आहे असे म्हणत हे धोरण आपण आणू शकतो का हे आपण सांगा असे बाळासाहेब थोरात म्हणताच विखे पाटील उत्तरासाठी उठले आणि त्यांनी थोरांतांवरच आरोप केले. उत्तरात विखे म्हणाले, थोरातांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. त्यांच्या काळातच या गुंडागर्दीच्या गोष्टी जास्त वाढल्या आहेत. तसेच, आम्ही यावर धोरण आणले याचा त्यांना त्रास होतोय असा टोलाही विखे पाटलांनी लगावला आहे. त्यावर पुन्हा थोरात यांनी आपण हे आरोप आपण अजिबात मान्य करणार नाहीत असे म्हणत आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान एका जिल्ह्यातील हे दोन राजकारणी सभागृहातही एकमेकांविरूद्ध चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे.