राधाकृष्ण विखे यांची बाळासाहेब थोरात आणि निलेश लंके यांच्यावर खोचक टीका, अतिक्रमण कारवाई केवळ सुपा येथेच नाही तर संपूर्ण राज्यात…
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | LOK SABHA ELECTION | PRIME MINISTER NARENDRA MODI | GUARDIAN MINISTER RADHAKRISHNA VIKHE PATIL | GRAND ALLIANCE | CONGRESS LEADER BALASAHEB THORAT | FORMER MLA NILESH LANKA | STATEMENT OF RADHAKRISHNA VIKH ABOUT INCONVENIENCE TO PUBLIC DUE TO ENCROACHMENT | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
लोकसभा निवडणुकीत विश्वनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या निर्धार देशातील जनतेन केला होता.मतदाना नंतर आलेल्या कल चाचण्यातून यावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे मत महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे. माध्यमांशी बोलतांना राधाकृष्ण विखे म्हणाले की.अहील्यानगर दक्षिण मतदारसंघात महायुतीचाच विजय होणार असा विश्वास व्यक्त करून लोकांनी विकास प्रक्रीयेला साथ दिली असल्याचे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास प्रक्रीयेला देशातील मतदारांनी पाठबळ दिले आहे.अहील्यानगर मतदार संघातही जनतेने विकासालाच प्राधान्य दिले आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराचा विजय होणार हा विश्वास आमचा कायम असल्याचे राधाकृष्ण विखे म्हणाले आहेत.
स्त्रोत सोशल मिडिया
बाळासाहेब थोरात यांना राधाकृष्ण विखे यांचा खोचक सल्ला….
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या दाव्याची खिल्ली उडवताना राधाकृष्ण विखे म्हणाले की ज्यांना काँग्रेससाठी जिल्ह्यात एकही जागा आणता आली नाही. त्यांनी दुसऱ्यांची तळी उचलण्यात धन्यता मानली आहे. आता स्वतःच्या अस्तित्वाची चिंता करा असा खोचक सल्ला राधाकृष्ण विखे यांनी दिला आहे. सुपा येथे झालेली अतिक्रमण हटाव मोहीम ही सूडबुद्धीने झाल्याचा आरोप करत मविआ नेते निलेश लंके यांनी राधाकृष्ण विखे यांच्यावर टीका केली होती. याबाबत बोलताना लंके काय म्हणतात याला माझ्या दृष्टीने महत्व नाही असे राधाकृष्ण विखे म्हणाले आहेत. ही कारवाई केवळ सुपा येथेच नाही तर संपूर्ण राज्यात सुरु आहे. जिथे अतिक्रमणामुळे जनतेची गैरसोय होती तिथे जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे. त्याबाबत वेगळे वाटण्याची गरज नाही. मात्र, ज्यांनी आपला धंदाच अशा भाडोत्री लोकांवर सुरु केला आहे. त्यांना वाईट वाटणे स्वाभाविक असल्याचे राधाकृष्ण विखे म्हणाले आहेत. अचारसंहीता अद्याप शिथिल झाली नसली तरी टंचाईच्या बाबतीत सर्व सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.पाणी आणि चारा यांची टंचाई कुठेही भेडसावणार नाही याची दक्षता घेतली जात असल्याचे राधाकृष्ण विखे यांनी सांगितले आहे.