TIMES OF AHMEDNAGAR
भारतीय जनता पक्षाचे निवडणूक चिन्ह कमळ आहे. भाजपचे कमळ चिन्ह काढून घेण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. यावर सुनावणी घेत मद्रास उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली.उच्च न्यायालयाने भाजपच्या निवडणूक चिन्ह गोठवावे असे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावेत असे याचिकेत म्हटले होते. मुख्य न्यायाधीश एसव्ही गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती डी भरत चक्रवर्ती यांचा समावेश असलेल्या मद्रास उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने तामिळनाडूच्या अहिंसा सोशलिस्ट पार्टीचे संस्थापक टी रमेश यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली.
स्त्रोत.सोशल मिडिया
कमळ हे देशाचे राष्ट्रीय फुल.
कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे त्यामुळे ते चिन्ह कोणत्याही राजकीय पक्षाला दिले जाऊ शकत नाही आणि त्याचा वापर करू देणे म्हणजे राष्ट्रीय अखंडतेचा अपमान आहे. असा दावा तामिळनाडूच्या अहिंसा सोशलिस्ट पार्टीचे संस्थापक टी रमेश यांनी दाखल केलेल्या याचिकेत केला होता. यावर दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकूण घेतल्यानंतर मुख्य न्यायाधीश एसव्ही गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती डी भरत चक्रवर्ती यांचा समावेश असलेल्या मद्रास उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने टी रमेश यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली.