दोन्ही महिलांवर अॅसिड फेकले…..
दरोडेखोरांचा हा प्रयत्न फसला, पण हर्षदा यांनी त्यांना पाहिल्याची शंका त्यांना होती. यामुळे दरोडेखोरांनी हर्षदाला लक्ष्य करण्यास सुरुवात केली. सोमवारी (२१ एप्रिल) रोजी दरोडेखोरांनी हर्षदावर वीट फेकली, पण ती थोडक्यात बचावली. मंगळवार (दि.२२) हर्षदा आपल्या मुलीला घेऊन फत्त्याबाद येथील दवाखान्यात गेली होती. त्यांच्यासोबत बाबासाहेब यांची पुतणीही होती. दवाखान्यातून स्कूटीवर घरी परतत असताना दोन अज्ञात व्यक्ती मोटरसायकलवरून आले आणि त्यांनी दोन्ही महिलांवर अॅसिड फेकले. यात हर्षदाची पाठ आणि पुतणीची छाती भाजली. दोघींनाही तातडीने लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सलग दोन दिवस हर्षदावर हल्ले झाल्याने आरोपी स्थानिक किंवा जवळपासचे असावेत, असा संशय व्यक्त केला जात आहे. बाबासाहेब आठरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून लोणी पोलिस ठाण्यात दरोडा आणि अॅसिड हल्ल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.