मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोल्हापुरातून महायुतीच्या जाहीरनाम्यातील १० महत्त्वाच्या घोषणांची माहिती दिली आहे. आजची सभा खूप ऐतिहासिक आहे. १९९५ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी इथून प्रचाराचा शुभारंभ केला आणि इतिहास घडवला आहे. आई अंबाबाईने नेहमी आम्हाला आशीर्वाद दिला आहे. आज देखील आई अंबाबाई आम्हाला आशीर्वाद देईल. यावेळी २३ तारखेला विजयाचा गुलाल उधळायला इथं येऊ. तत्पूर्वी, वचननाम्यातील १० कलमं जनतेच्यासमोर ठेवतो आहे. असे म्हणत एकनाथ शिंदेंनी वचननाम्यातील मोठी घोषणा सांगितली आहे. त्यानुसार, लाडक्या बहिणींना २१०० रुपये दरमहा मिळणार असल्याची माहिती दिली. तसेच आम्ही बोलतो ते करुन दाखवतो. असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले.
(संग्रहित दृश्य.)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वचननाम्यातील केलेल्या १० घोषणा.
१) लाडक्या बहिणींना रु.२१०० प्रत्येक महिन्याला. १५०० वरुन २१०० देण्याचे तसेच महिला सुरक्षेसाठी २५००० महिलांना पोलीस दलात समावेश करण्याचे वचन!
२) शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला रु.१५००० प्रत्येक वर्षाला. १२००० वरुन १५००० देण्याचे तसेच एमएसपी वर २०% अनुदान देण्याचे वचन!
३) प्रत्येकास अन्न आणि निवारा प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्याचे वचन!