शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट करत शिवसेना शिंदे गटावर निशाणा साधलाय. त्यात एक बकऱ्याचा फोटो असून खबर पता चली क्या? एसंशि गट… असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले आहे. संजय राऊत म्हणाले की एक बकरा आहे. महारष्ट्रांतील एक बळीचा बकरा आहे. तो बकरा खाटकाच्या लाकडावर उभा आहे. बकऱ्याला सांगितले आहे की फार शहाणपणा केलास तर मान उडवीन. गप्प उभे राहायचं आणि बे बे करत राहायचं असे दोन दिवसांपूर्वी त्या बकऱ्याच्या कानात दिल्लीत कोणीतरी सांगितले आहे. आता बस झाले तुमचे खूप ऐकले तर या पोस्टमध्ये तुम्ही एसंशि गट असा उल्लेख केला आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की तुम्हाला समजले पाहिजे एसंशि गट काय आहे? तुम्हाला यूबीटी माहित आहे ना आणि तुम्हाला एसंशि गट माहीत नाही का? असे संजय राऊत यांनी यावेळी म्हटले. दरम्यान सामना संपादकीयमध्ये काँग्रेसला इंडिया आघाडीची आठवण करून देण्यात आली आहे. लोकसभेच्या निकालानंतर इंडिया आघाडी कुठे आहे? असे प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नाला काँग्रेसने गुजरातच्या अधिवेशनातून उत्तर देणे गरजेचे होते, असे सामनाच्या संपादकीयमध्ये म्हटले आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की सामनात जर असे म्हटले असेल तर त्यात चुकीचे काय? आम्ही सगळे काँग्रेस बरोबर जे बांधील आहोत ते इंडिया आघाडी गट म्हणून बांधील आहोत. एक ग्रुप म्हणून बांधील आहोत. जर हुकुमशाहीशी लढायचे असेल तर काँग्रेसने त्याचा पुढाकार घेतला पाहिजे. इंडिया आघाडीच्या सदस्यांशी वारंवार संवाद ठेवला पाहिजे. जो संवाद आज कमी झालेला आहे असे संजय राउत यांनी म्हटले.