IPL २०२४ च्या जेतेपदावर शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने आपलं नाव कोरलं आहे. केकेआरने सनरायझर्स हैदराबादचा ८ गडी राखून पराभव केला आहे. सामन्यानंतर शाहरुख खानचे कुटुंबीय आणि केकेआरच्या खेळाडूंनी मैदानावर एकत्रित सेलिब्रेशन केलं आहे. बादशाहच्या संघाने तब्बल १० वर्षांनी तिसऱ्यांदा आयपीएलची ट्रॉफी आपल्या नावे केली आहे.

KKR Flying Kissस्त्रोत.सोशल मिडीया.

त्याच्या चाहत्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता.

बॉलीवूडचा बादशाह अहमदाबाद येथे झालेल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यानंतर प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल झाला होता. यानंतर बादशाह अंतिम सामन्याला उपस्थित राहणार की नाही ? याबद्दल त्याच्या चाहत्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. अखेर आपल्या संघाचा उत्साह वाढवण्यासाठी अवघ्या एका दिवसात बादशाह घराबाहेर पडला होता. रविवारी (२६ मे) दुपारी संपूर्ण कुटुंबीयांसह शाहरुख चेन्नईला रवाना झाला होता. यावेळी त्याची लेक सुहाना, पत्नी गौरी खान, दोन्ही मुलं आर्यन व अबराम, मॅनेजर पूजा ददलानी,अनन्या पांडे, शनाया कपूर ही मंडळी उपस्थित होती.

KKR विजयानंतर शाहरुखला मिठी मारत सुहाना भावूक; बापलेकीचा व्हिडीओ व्हायरलस्त्रोत.सोशल मिडिया.

केकेआरच्या विजयानंतर खान कुटुंबीयांनी एकच जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं. सामना जिंकताच सुहानाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. शाहरुखला मिठी मारून त्याची लाडकी लेक भावुक झाल्याचं स्टेडियममध्ये पाहायला मिळालं. यानंतर बादशाहने त्याच्या धाकटा मुलगा अबराम आणि आर्यनला देखील जवळ घेतलं. सध्या सुहानाने शाहरुखला भावुक होत मिठी मारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. सुहाना या व्हायरल व्हिडीओमध्ये शाहरुखला आर यु हॅप्पी…आय एम सो हॅपी असं बोलत असल्याचं पाहायला मिळत आहे. वडील आणि मुलांमधल्या या सुंदर नात्याचं नेटकरी कौतुक करत आहेत.

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर आयपीएल (IPL) २०२४ चा अंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात शाहरुखच्या केकेआर टीमने सनरायझर्स हैदराबादचा ८ गडी राखून पराभव केला. २०१२ मध्ये याच मैदानावर, केकेआरने त्यांचं पहिलं विजेतेपद जिंकलं होतं. पुढे २०१४ व त्यानंतर थेट दहा वर्षांनी म्हणजे रविवार २६ मे २०२४ रोजी केकेआरच्या संघाने तिसऱ्यांदा चॅम्पियन ठरली.