शरद पवारांनी त्या नेत्याला थेट दिला कडक शब्दात दम…. त्या नेत्याला म्हणाले माझ्या नादी लागू नको,कार्यक्रम ……
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | LONAVALA | NATIONAL CONGRESS PARTY CHIEF SHARAD PAWAR | JHARKHAND CHIEF MINISTER HEMANT SOREN | DELHI CHIEF MINISTER ARVIND KEJRIWAL | ANIL DESHMUKH | SANJAY RAUT | AJIT PAWAR | MLA SUNIL SHELKE | MLA SUNIL SHELKE HAS BEEN GIVEN BREATH BY SHARAD PAWAR | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाचे प्रमुख शरद पवार हे सध्या लोणावळा दौऱ्यावर आहेत. शरद पवार गटाने लोणावळ्यामध्ये कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केले आहे. स्वतः शरद पवार यांनी आज मावळमधील त्यांच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आहे. लोणावळ्यात पोहोचल्यावर कार्यकर्त्यांनी तुतारी फुंकून शरद पवार यांचे जंगी स्वागत केले आहे. मोठ्या क्रेनच्या सहाय्याने शरद पवारांना हार घालण्यात आला होता. तसेच जेसीबीद्वारे त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. दरम्यान अजित पवार गटातील लोणावळ्यातील १०० हून अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आज शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षात प्रवेश केला आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया
केंद्र सरकार आणि राज्यातील शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल.
यावेळी शरद पवार यांनी केंद्र सरकार आणि राज्यातील शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शरद पवार म्हणाले देशात भाजपाकडून सत्तेचा गैरवापर होत आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना तुरुंगात डांबलं आहे. आता ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मागे लागले आहेत. केजरीवाल गेल्या १० वर्षांपासून दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना आता क्राईम ब्रँचने आठवं समन्स धाडलं आहे. निवडणुकीच्या तोंडावर केजरीवाल यांना अटक करण्याची भाजपाची योजना आहे. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकल्यानंतर भाजपाची आता दिल्लीवर नजर आहे. महाराष्ट्रातही तशीच परिस्थिती आहे. महाराष्ट्रात अनिल देशमुखांना सहा महिने तुरुंगात ठेवले होते. तर शिवसेनेचे मुखपत्र सामना चे संपादक आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राउत यांनाही चार महिने तुरुंगात अडकवले होते. कारण राऊत हे सामनातून भाजपावर टीका करतात. म्हणजे या देशात बोलण्याचे आणि लिहिण्याचे स्वातंत्र्य राहिलेले नाही.
स्त्रोत.सोशल मिडिया.
आमदार कोणामुळे झालास आठवतंय का ?
शरद पवार म्हणाले मी इथे आलो तेव्हा मला सांगण्यात आले की इथल्या काही लोकांनी आणि स्थानिक आमदाराने आजच्या बैठकीला तुम्ही येताय म्हणून तुम्हाला दमदाटी केली. कोणीतरी त्यांच्यावर टीका केली म्हणून त्यांनी त्या टीकाकारांनाही फोन करून दम दिला. हा काय प्रकार आहे ? कोणी चूक केली तर त्यांच्यावर टीका करायची नाही का ? लोकशाहीत जाहीर बोलायचं नाही का ? कोणी बोललं तर दमदाटी होते. इथले जे आमदार दमदाटी करत आहेत त्यांना मला सांगायचं आहे की बाबा रे तू आमदार कोणामुळे झालास आठवतंय का ? तुझ्या प्रचारसभेला इथे कोण आलेलं आठवतंय का ? तेव्हा पक्षाचा अध्यक्ष कोण होता ? निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी पक्षाचं चिन्ह लागतं पक्षाचा फॉर्म लागतो तो फॉर्म आणि चिन्ह तुला कोणी दिले ? तुझ्या अर्जावर कोणाची सही होती ? तू माझ्या सहीने तुझा अर्ज भरला होतास. तुम्ही लोक आज त्याच पक्षाच्या आणि विचारांच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करता ? तुला निवडून आणण्यासाठी जे कार्यकर्ते राबले, ज्यांनी तुझ्यासाठी घाम गाळला, त्यांनाच तू दमदाटी करतोस. माझी त्या आमदाराला विनंती आहे. एकदा दमदाटी केलीस पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात मला. मी या रस्त्याने कधी जात नाही. परंतु या रस्त्याने जाण्याची स्थिती कोणी निर्माण केली तर मी त्याला सोडतही नाही. कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मावळचे आमदार सुनील शेळके यांना थेट इशारा देत मलाही शरद पवार म्हणतात अशा शब्दात सज्जड दम दिला आहे.