TIMES OF AHMEDNAGAR

 

महिला कुस्तीपटू विनेश फोगटने एक भावनिक पोस्ट लिहून कुस्तीतून संन्यास घेतला आहे. कुस्ती स्पर्धा आपल्याला आईसारखी आहे. आज मी कुस्तीशी हरले असं म्हणत विनेशने ही भावनिक पोस्ट करत कुस्तीमधून संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं आहे. ऑलिम्पिकच्या कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत धडक मारणाऱ्या विनेश फोगाटचं वजन १५० ग्रॅमने जास्त भरलं त्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं आणि तिचं सुवर्ण पदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. ज्यानंतर निराश झालेल्या विनेश फोगाटने कुस्तीला अलविदा केला आहे.

 

माँ कुश्ती मेरे से जीत गई मैं हार गई माफ़ करना……

माँ कुश्ती मेरे से जीत गई मैं हार गई माफ़ करना आपका सपना मेरी हिम्मत सब टूट चुके इससे ज़्यादा ताक़त नहीं रही अब। अलविदा कुश्ती २००१-२०२४ आप सबकी हमेशा ऋणी रहूँगी माफी.

असं म्हणत कुस्तीला आई समान मानत विनेश फोगाटने कुस्तीतून संन्यास घेतला आहे.

ओलंपिक: वजन ज्यादा होने से अयोग्य हुईं विनेश फोगाट के सपोर्ट स्टाफ की होगी जांच - Olympics WFI to investigate support staff of Vinesh Phogat who was disqualified due to being overweight(संग्रहित दृश्य.)

तिला लढायचं होतं, पण मैदानात येण्यापूर्वीच ती अपात्र ठरली होती.

ऑलिम्पिकच्या स्पर्धेत विनेश फोगटनं तिच्या प्रतिस्पर्धी विरुद्ध उपांत्य फेरीचा सामना ५-० च्या फरकानं जिंकला. प्रतिस्पर्धीसाठी तिनं साधा एक गुणही सोडला नव्हता. त्यावेळी विनेश फोगाटच्या हाती सुवर्ण पदक लागणार आणि भारताचा गौरव होणार हे निश्चित होते. त्यामुळे विनेश गोल्ड आणणारच ही खात्री जवळपास प्रत्येक भारतीयाच्या मनात होती. ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी विनेश फोगाट हि पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे. पण, १५० ग्रॅम वजन पात्र ठरलं आणि विनेशला सुवर्ण पदकाच्या सामन्यासाठी अपात्र ठरवण्यात आलं. तिला लढायचं होतं, पण मैदानात येण्यापूर्वीच ती अपात्र ठरली होती.

 

खून निकाला, बाल नाखून काटे...विनेश फोगाट ने वजन कम करने के लिए किए ये काम, हैरतअंगेज खुलासा | vinesh phogat draws her blood cuts hairs nails to reduce weight paris Olympics wrestling(संग्रहित दृश्य.)

आणखी ५० ग्रॅम वजन जर विनेश कमी करु शकली असती तर…..

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार मंगळवारी रात्री विनेश फोगाटला कळलं की तिचं वजन ५२ किलो आहे. त्यानंतर तिने वजन कमी करण्यासाठी भरपूर मेहनत घेतली. विनेशनं जॉगिंग केलं,सायकलिंगही केलं,दोरीवरच्या उड्या मारल्या, त्यानंतर विनेश फोगटने केस कापले, नखं कापली, रक्तही काढलं मात्र विनेशच्या हाती यश आले नाही.तिचं वजन १५० ग्रॅम जास्त भरलं. आणखी ५० ग्रॅम वजन जर विनेश कमी करु शकली असती तर ती ही स्पर्धा खेळू शकली असती. आता तिने कुस्तीतून निवृत्ती घेतली आहे.