TIMES OF AHMEDNAGAR
शहरात रविवारी (१२ मे) रोजी मंगलगेट कोठला येथे दोन गटात मारहाण झाली होती. या वेळी सचिन नामक एका व्यक्तीला काही पोरांकडून चोप देण्यात आला होता.निवडणुकांचे वातावरण असल्यामुळे शहरातली शांतता भंग होऊ नये यासाठी पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांच्या त्वरित उपलब्धतेमुळे वातावरण चिघळले नाही. सचिन नामक त्या व्यक्तीला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी घटनेची माहिती घेण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला सचिनने लाथ मारली होती. सचिनने लाथ मारताच जमावाने पत्रकारावर हल्ला चढवला होता.
Video Player
00:00
00:00