त्याने तिला दारू पाजली, आणि विश्रांतीच्या बहाण्याने तिचा तिचा गळा चिरला , पकडले जाऊ नये म्हणून सीताच्या हातावर टॅटूसह कातडेसुद्धा ओढून……
TIMES OF AHMEDNAGAR | INDIA | UDAIPUR | HUSBAND AND WIFE KILLED THEIR GIRLFRIEND TOGETHER | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
एप्रिल महिन्यात झालेल्या एका हत्येप्रकरणी पोलिसांनी तब्बल ३९ दिवसांनंतर आरोपीला अटक केली आहे. आरोपीला अटक केल्यानंतर त्याने सांगितलेले हत्येचे कारण हादरवून टाकणारे आहे.देवीलाल आणि सीता या दोघांचे विवाहबाह्य संबंध होते. विवाहबाह्य संबंधातूनच ही हत्या झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे देवीलालच्या पत्नीनेच या हत्येसाठी मदत केली आहे. सीतादेखील विवाहित होती. तिला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. परंतु तिचा नवरा तिच्याबरोबर राहत नसल्याने तिची मुलगी तिच्या नवऱ्याबरोबर राहत होती आणि मुलगा सीताबरोबर राहत होता. परंतु देवीलालने गेल्यावर्षी सिताच्या मुलाची डोके फोडून हत्या केली होती. धक्कादायक म्हणजे आपल्या मुलाची हत्या केल्याची माहिती असतानाही सीताने यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली नव्हती.
स्त्रोत सोशल मिडिया
चाकूने हल्ला करून तिची गळा चिरून हत्या….
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवीलाल आणि सीता यांच्या विवाहबाह्य संबंधाविषयी देवीलालच्या पत्नीला कळले होते. त्यामुळे या दोघा पती-पत्नीने मिळून सीताची हत्या करण्याचे ठरवले होते. देवीलालने सीताला एका नातेवाईकाच्या घरी घेऊन जायचे असल्याचे सांगितले. आणि दुचाकीवर काही वेळ प्रवास केल्यानंतर देवीलाल आणि सीता रस्त्याच्या कडेला असलेल्या दारूच्या दुकानात थांबले होते. दोघांनी तिथे एकत्र मद्यपान केले. त्यानंतर देवीलाल परमार याने तिला एका जंगलात नेले आणि विश्रांतीच्या बहाण्याने झोपण्याचे नाटक केले. सीतानेही विश्रांती घेण्याचे ठरवले होते. यावेळी देवीलालने सीतावर चाकूने हल्ला करून तिची गळा चिरून हत्या केली आहे. सीताच्या हातावर देवीलालच्या नावाचा टॅटू देखील होता. पकडले जाऊ नये म्हणून त्याने सीताच्या हातावरील कातडेसुद्धा ओढून काढले होते.
स्त्रोत सोशल मिडिया
त्याला पोलिसांनी अटक केली.
जंगलात मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. प्राथमिक तपासात पोलिसांना काहीही सापडले नाही. परंतु एका हवालदाराला देवीलालबद्दल त्याच्या एका खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. पोलिसांनी देवीलालला चौकशीसाठी बोलावल्यानंतर त्याने आपला गुन्हा मान्य केला आणि त्याला पोलिसांनी अटक केली आहे.