TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | OFFICE OF THE DISTRICT SUPERINTENDENT OF POLICE KOTWALI POLICE STATION | HOOKAH PARLOR | OBSCENE CHALE IN CAFES | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
तरुण हे देशाचे भविष्य मानले जाते. तरुणांनी चांगले शिक्षण घेऊन यशस्वी झाले पाहिजे. मात्र आजची तरुणाई सुधर म्हणण्याच्या पलीकडे चालली आहे. तरुणांना सध्या खाण्या-पिण्यात,आणि ऐश करण्यात जास्त आनंद वाटत आहे. तरुणाई गुन्हेगारीकडे वळण्याचे प्रमाण जास्त वाढत आहे. त्याला कारणही अनेक आहे मात्र मुख्य कारण म्हणजे अवैध व्यसन या व्यसनामुळे तरुणाई कोणतीही किंमत मोजायला तयार असल्याचे बोलले जाते.
स्त्रोत.सोशल मिडिया.
अवैध धंद्यांचे साम्राज्य अन तरुणाईचे वाटोळे.
अनेक तरुण हे कॉलेजच्या नावाखाली हुक्का पार्लरमध्ये हुक्क्याचे धडे गिरवत असतात. काही बहाद्दूर तरुण तरुणी मैत्रिणीला घेत थेट अश्लील चाळेच करत असतात. बहुतांश हुक्का पार्लर आणि कॅफे हे कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहेत. मात्र कोतवाली पोलिसांचे या कॅफेंकडे दुर्लक्ष असल्याचे बोलले जाते. या कॅफेंमध्ये चहा,कॉफीच्या नावाखाली अश्लील चाळे होत असल्याचे जगजाहीर आहे. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने काही महिन्यापूर्वी छापे मारले होते. मात्र हे कॅफे पुन्हा जोरात सुरु असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नेत्यांचा सिक्का , जोरदार हुक्का
कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत भाऊसाहेब फिरोदिया, महात्मा फुले, सविता फिरोदिया, अशा शाळांचा तर आय.टी.आय कॉलेज , पॉलीटेक्निक अशा इतर अनेक महाविद्यालयांचा समावेश आहे मुख्य बाब म्हणजे काही महत्वाच्या विध्यालयांच्या परिसरातच या अश्लील कॅफेंचे जाळे पसरले आहे. या कॅफेंमध्ये तरुण तरुणींना बसण्याच्या नावाखाली अश्लील कृत्य करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाते. तीन-चारशे रुपयात या विद्यार्थिनींची अब्रू निलाम होत असल्याचे समजते. मात्र या कॅफेचालकांना नेत्यांचा लिफाफा आशिर्वाद असल्याने या कृत्यांना जास्त जोर येत आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
कारवाई कधी ?
कॅफेमधल्या अश्लील चाळ्यांची गती वाढली आहे. तरुण हुक्क्यांचे सेवन करतांना बेधडक आहेत. कोणत्याही कायद्याची भीती या अवैध हुक्का पार्लर चालकांना नाही. कॅफेचालक आणि हुक्का पार्लर चालक बेधुंध अवैध कारभार चालवत आहे. यावर पोलीस कधी कारवाई करणार असा सवाल सध्या नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.