ईदच्या निमित्तानं प्रदर्शित झालेल्या सिकंदर मध्ये सलमान खानसोबत रश्मिका मंदाना देखील दिसली आहे. चित्रपटात सलमान-रश्मिकाच्या ऑनस्क्रिन जोडीला खूप पसंती मिळत आहे. पण चित्रपटात रश्मिका व्यतिरिक्त श्रेया गुप्तो नावाची आणखी एका दाक्षिणात्य अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत दिसून आली आहे. अभिनेत्री श्रेया गुप्तोनं सलमान खान स्टारर सिकंदरमधून पदार्पण केलं आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री श्रेया गुप्तोनं अलिकडेच तिच्या इंडस्ट्रीमधील प्रवासाबाबत मोकळेपणानं भाष्य केलं आहे. तिनं म्हटलं आहे की साऊथ इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काऊचची बळी ठरली. बंगाली कुटुंबातील श्रेया चेन्नईमध्ये वाढली. तिनं तिच्या कारकिर्दीची सुरुवात तमिळ चित्रपटांपासून केली. डीएन इंडियाशी बोलताना श्रेया म्हणाली की मला चेन्नईमध्ये कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला. त्यावेळी कास्टिंग डायरेक्टर नव्हता. म्हणूनच मला मुंबईत येऊन माझं नशीब आजमवायचं होतं. मुंबईत मला अशा कोणत्याही गोष्टीचा सामना करावा लागला नाही. २०१४ मध्ये मी एका दिग्दर्शकाच्या ऑफिसमध्ये ऑडिशनसाठी गेले होते. पूर्वी असं व्हायचं की फक्त दिग्दर्शक आणि निर्माते ऑडिशनसाठी बोलावायचे. मी ऑडिशनला माझ्या आईसोबत गेले आणि जेव्हा मी केबिनमध्ये गेले त्यावेळी दिग्दर्शकानं मला त्याच्या मांडीवर बसून तो सीन दाखवायला सांगितला. मी त्यावेळी खूपच लहान होते. पण मी खूप अस्वस्थ झाले. मी खोटं बोलले की मी सीनची प्रॅक्टिस करेन आणि दुसऱ्या दिवशी येईन. मग मी तिथून पळून गेले. श्रेया गुप्तो पुढे बोलताना म्हणाली की त्या घटनेनंतर तिला वाटलं की जर इतका अभ्यास करुनही तिला अशा परिस्थितीचा सामना करावा लागला तर ती मुंबईतच तिचं नशीब आजमावेल. आता दाक्षिणात्य इंडस्ट्रीची परिस्थिती खूपच चांगली झाली आहे.
(संग्रहित दृश्य.)
मुलाखतील बोलताना श्रेयाने काय म्हटले …
मुलाखतीत बोलताना श्रेयानं चित्रपटात भूमिका मिळण्याबाबत आणि सलमान खानसोबत तिला मिळालेल्या पहिल्या मोठ्या संधीबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या. तिनं सांगितलं की अभिनेत्रीनं सर्वात या भूमिकेसाठी ऑडिशन दिलं आणि नंतर तिला कास्ट करण्यात आलं. श्रेया मुलाखतीत म्हणाली की बॉलीवूड चित्रपटाच्या सेटवर हा माझा पहिलाच अनुभव आहे आणि मी त्याबद्दल अधिक कृतज्ञ राहू शकत नाही. एआरएम अंतर्गत सलमान खानसोबत आणि नाडियालवालाच्या प्रॉडक्शनमध्ये काम करणं माझ्यासाठी खूप रोमांचक होतं. ही खूप मोठी नावं आहेत आणि या जगात पाऊल ठेवणं खरोखरच अविश्वसनीय वाटलं. दरम्यान श्रेया गुप्तोनं सिकंदरमधून बॉलिवूड डेब्यू केला. सिकंदरपूर्वी श्रेयानं रजनीकांतच्या दरबार चित्रपटात काम केलं होतं. ती वरणम आयराम आणि मथियाल वेलमध्येही दिसली होती. सूर्या आणि रजनीकांत सारख्या सुपरस्टार्ससोबत काम करूनही श्रेयाला अनेक प्रोजेक्ट्ससाठी नाकारण्यात आलं. वेळा नकाराचा सामना करावा लागला आणि चांगली भूमिका मिळविण्यासाठी तिला खूप मेहनत घ्यावी लागली.