TIMES OF AHMEDNAGAR
दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या युवा (१९ वर्षांखालील) विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतून भारताचा उद्याचा क्रिकेटर तयार होणार इतकी सचिनची कामगिरी झाली आहे. या विश्वचषकात ११६.६६च्या स्ट्राईक रेटने सचिनच्या नावावर २९४ धावा जमा असून स्पर्धेतील सर्वोत्तम विजयवीरांमध्ये त्याची गणना केली जात आहे. सुपर सिक्स फेरीत नेपाळविरुद्ध शतकी खेळी केल्यानंतर उपांत्य फेरीत त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केलेली ९६ धावांची निर्णायक ठरली. २४९ धावांचा पाठलाग करताना भारताची ४ बाद ३२ अशी स्थिती झाली होती. यातून सचिन आणि कर्णधार उदय सहारन यांनी भारताला बाहेर काढले. त्यामुळे भारताला नवव्यांदा अंतिम फेरीत धडक मारता आली.


