कपाळावर टिकली, ओठांवर लिपस्टिक, हातात बांगड्या, महिलांचे अंतर्वस्त्र घालून एका वरिष्ठ अधिकाऱ्याची आत्महत्त्या…..
TIMES OF AHMEDNAGAR | UTTARAKHAND | UTTARAKHAND AIRPORT AUTHORITY | SUICIDE BY A SENIOR OFFICIAL WORKING IN THE AUTHORITY AT THE TIME OF SUICIDE, | HE DISGUISED HIMSELF AS A WOMAN | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
उत्तराखंडमध्ये विमानतळ प्राधिकरणात काम करणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केलेली आत्महत्या सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अधिकाऱ्यांसाठी असलेल्या निवासी संकुलात सदर अधिकारी महिलांच्या वेशात मृत पावल्याचे दिसून आले आहे. यावेळी त्याने कपाळावर टिकली, ओठांवर लिपस्टिक, हातात बांगड्या, महिलांचे अंतर्वस्त्र आणि महिलांचा गाऊन घातला होता. सदर अधिकाऱ्याने हा वेश का धारण केला होता, याची कुणालाही कल्पना नाही. पोलिसही याचा तपास करण्याचा प्रयत्न करत आहेत. सदर अधिकाऱ्याने आत्महत्या केली असावी, असाही एक संशय व्यक्त करण्यात येत आहे. सदर अधिकाऱ्याची पत्नी शिक्षिका असून पतीच्या निधनावेळी ती पिथौरीगड याठिकाणी होती.
स्त्रोत सोशल मिडिया
घरातील बेडरुममध्ये केली आत्महत्त्या….
उधम सिंह नगरच्या पोलीस अधीक्षक मंजूनाथ टीसी यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, अधिकाऱ्याचा बराच वेळ काही संपर्क झाला नसल्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी घरातील बेडरुमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा त्यांना हे भयानक चित्र दिसले आहे. पोलिसांनी सांगितले की, गळफास घेतलेल्या अधिकाऱ्याला नातेवाईकांनी खाली उतरवून रुग्णालयात दाखल केले होते. मात्र तिथे डॉक्टरांनी ते मृत असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या शरीरावर मारहाण किंवा झटापटीच्या जखमा नव्हत्या. बेडरुममध्येही कुणी बळजबरीने घुसल्याचे काहीच पुरावे आढळले नाहीत. बेडरुमचा दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
आत्महत्तेवेळी केला महिलांचा वेश…..
विमानतळ प्राधिकरणच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सदर अधिकाऱ्याच्या खोलीत आणखी दोन नातेवाईक होते. त्यांनी रात्री उशीरापर्यंत गप्पा मारल्या होत्या. सकाळी आपण आपल्या गावी निघायचे आहे, असे त्यांचे ठरले होते. नंतर ते वेगवेगळ्या खोलीत झोपायला गेले होते. पोलिसांनीही याला दुजोरा दिला आहे. रात्री तिघांनीही जेवण केल्यानंतर नातेवाईक वेगळ्या खोलीत झोपायला गेले. तर मृत अधिकारी त्याच्या खोलीत झोपण्यासाठी गेला होता. सकाळी अनेक फोन करूनही अधिकारी प्रतिसाद देत नसल्यामुळे खोलीतील नातेवाईकांनी आजूबाजूला राहणाऱ्या इतर अधिकाऱ्यांना याची माहिती दिली होती. इतर अधिकारी आणि नातेवाईकांनी सकाळी अधिकाऱ्याच्या खोलीचा दरवाजा तोडल्यानंतर त्यांना ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत अधिकाऱ्याचा मृतदेह दिसला. तसेच यावेळी त्याने महिलांचा वेश केला असल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. पोलीस आता या प्रकरणात नातेवाईक आणि इतर अधिकारी वर्गाची चौकशी करत आहेत.