By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: सुजय विखेंचे बाळासाहेब थोरातांना उत्तर.ठेकेदार आणि माफीयांच्‍या जीवावर राजकारण करतात,आमच्‍याकडे दहशत असती तर…..
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > अहमदनगर > सुजय विखेंचे बाळासाहेब थोरातांना उत्तर.ठेकेदार आणि माफीयांच्‍या जीवावर राजकारण करतात,आमच्‍याकडे दहशत असती तर…..
अहमदनगर

सुजय विखेंचे बाळासाहेब थोरातांना उत्तर.ठेकेदार आणि माफीयांच्‍या जीवावर राजकारण करतात,आमच्‍याकडे दहशत असती तर…..

Last updated: 2024/10/30 at 6:49 PM
By BHAIYYASAHEB BOXER 5 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR 

ठेकेदार आणि माफीयांच्‍या जीवावर राजकारण करण्‍यासाठी काही लोकं आपल्‍या भागात येत आहेत. परंतू या भागातील जनता त्‍यांना थारा देणार नाही. त्‍यांच्‍या तालुक्‍यातच त्‍यांची निष्‍क्रीयता उघड झाली आहे. केवळ हसून दुस-याची जिरवणे एवढेच काम संगमनेरच्‍या नेत्‍यांनी आजपर्यंत केले आहे. असल्‍याचा टोला महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी लगावला. महायुतीच्‍या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल करुन, मंत्री विखे पाटील यांनी विजय संकल्‍प मेळाव्‍यातून पदाधिकारी,  कार्यकर्ते आणि मतदारांशी संवाद साधला. जेष्‍ठनेते आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, आ.आशुतोष काळे, डॉ.सुजय विखे पाटील, शालिनीताई विखे पाटील, राष्‍ट्रवादीचे जिल्‍हाध्‍यक्ष कपिल पवार, आरपीआयचे जिल्‍हाध्‍यक्ष सुरेंद्र थोरात, शिवसेनेचे सागर बोठे, भाजपाचे तालुका अध्‍यक्ष दिपक रोहोम, ओबीसी आघाडीचे बाळासाहेब गाडेकर, मुस्लिम समाजाचे जेष्ठनेते रऊफ मौलाना, सभापती ज्ञानेश्‍वर गोंदकर, मुकूंदराव सदाफळ आदि याप्रसंगी उपस्थित होते.

Rajendra Pipada serious allegations against Radhakrishna Vikhe Patil and Sujay Vikhe Patil Shirdi Vidhan Sabha Constituency Maharashtra Politics Marathi News | 'विखे पाटील म्हणजे महादेवाच्या पिंडीवर बसलेला ...(संग्रहित दृश्य.)

आता मतं माघायला दारात येतील तेव्‍हा त्‍यांना जाब विचारा…

मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, महायुती सरकारच्‍या माध्‍यमातून या मतदार संघातील खंडकरी शेतक-यांचा प्रश्‍न सोडवून शेतक-यांना न्‍याय देता आला. निळवंडे कालव्‍याचे पाणी दिलेल्‍या शब्‍दाप्रमाणे आणून दाखविले. तरुणांच्‍या रोजगारासाठी औद्योगिक वसाहतीची उभारणी सुरु झाली आहे. आपल्‍या सर्वांच्‍या आशिर्वादाने ही लोकहिताची कामे करता आली. केवळ आपला मतदार संघच नाही तर जिल्‍ह्याच्‍या नामांतरा बरोबरच नेवासे येथील ज्ञानेश्‍वर श्रृष्टी , अहिल्‍यादेवींचे राष्‍ट्रीय स्‍मारक उभारण्‍याचा महत्‍वपूर्ण घेतला असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. एक रुपयात पीक विमा योजनेचा मोठा लाभ शेतक-यांना मिळाला आहे. मोफत वीज देण्‍याचा निर्णयही घेतला आहे. मुख्‍यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला मिळालेल्‍या प्रतिसादामुळे महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांना धडकी भरली आहे. योजना बंद पाडण्‍यासाठी महाविकास आघाडीचे नेते न्‍यायालयात गेले. आता मतं माघायला दारात येतील तेव्‍हा त्‍यांना जाब विचारा असे आवाहन करुन, महाविकास आघाडीकडे सांगायला काही राहीलेले नाही. फक्‍त कोन बनेगा करोडपती याची स्‍पर्धा सुरु असल्‍याची टिका त्‍यांनी केली आहे. महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांनी शिर्डीत येवून केलेल्‍या आरोपांना उत्‍तर देताना मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, तुम्‍ही आमच्‍याकडे येवून काही बोलायचे, ती तुमच्‍यासाठी लोकशाही असते. आम्‍ही थोडी टिका केली तर, लगेच लोकशाही धोक्‍यात असल्‍याचा आरोप करता. लोकशाही कुठेही धोक्‍यात नाही, तुमचे पद धोक्‍यात आले आहे. त्‍यामुळेच थोड्याशा आरोपांमुळे तुम्‍ही अस्‍वस्‍थ झाला आहात. वाळु माफीया आणि एंजटांना पुढे करुन, डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍यावर हल्‍ला करण्‍याचा कट रचल्‍याच्‍या आरोपाचा पुनरुच्‍चार करुन, वसंतराव देशमुख यांच्‍या वक्‍तव्‍याचे आम्‍ही कधीही समर्थन केले नाही. उलट त्‍यांच्‍यावर कारवाई करण्‍याची मागणी केली. पण ज्‍या निष्‍पाप महिलांना झाली, त्‍यांची माफी मागण्‍याचीही तुमची दानत नाही. टोळ्या आणि माफीयांच्‍या जीवावर राजकारण करुन, आम्‍ही कशी दहशत निर्माण करु शकतो हा संगमनेरच्‍या नेत्‍यांचा चेहरा आता राज्‍याला दिसला आहे. राहाता तालुक्‍यातील जनता ही खोट्या भूलथापांना बळी पडणार नाही. गणेश कारखाना चालवायला घेतला म्‍हणून तो शेतक-यांच्‍या मालकीचा राहीला. यापुर्वीच तुम्‍ही घ्‍यायला पाहीजे होता. संस्‍थावर चर्चा करायची असेल तर एकदा समोरासमोर याच असे आवाहन देवून समन्‍याची पाणी वाटप कायद्याचे भूत तुम्‍ही जिल्‍ह्याच्‍या मानगुटीवर बसविले त्‍याची किंमत मोजावी लागली. 

उद्दिष्टे, स्वप्न व शपथ – डॉ. सुजय विखे पाटील(संग्रहित दृश्य.)

आपल्‍या अन्‍नात माती कालविणा-यांना थारा देवू नका.

विधानसभेची निवडणूक ही तुमच्‍या सर्वांची आहे. मताधिक्‍य देण्‍याचे काम तुमचे आहे. गावात आणि बुथवर चांगल्‍या पध्‍दतीने काम करा असे अवाहन करुन, विकासाच्‍या प्रक्रीयेत आणि आपल्‍या अन्‍नात माती कालविणा-यांना थारा देवू नका. असे आवाहन त्‍यांनी केले. डॉ.सुजय विखे पाटील यांनी आपल्‍या आक्रमक भाषणात सांगितले की, मी चार सभा घेतल्‍या तर त्‍यांचे सिंहासन हालले, हीतर सुरुवात आहे. आता इकडे येवून तुम्‍ही काय करणार. ज्‍यांच्‍यासाठी येत आहात त्‍यांच्‍याकडून काही होणार नाही. हे या तालुक्‍यातील जनतेला माहीत आहे. मात्र आमच्‍या तालुक्यात येवून खालच्‍या पातळीवर जावून बोललात तर आम्‍ही आता कायद्याच्‍या सर्व चौकटी सोडून उत्‍तर देवू. आमच्‍या सहनशिलतेला कमजोरी समजू नका, असा इशाराही त्‍यांनी दिला. काल महाविकास आघाडीच्‍या सभा झाली. या सभेमध्‍ये हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटोही बॅनवर टाकायची आठवण राहीली नाही. आता तरी जागे व्‍हा आणि उध्‍दव बाळासाहेब ठाकरे गटातील सैनिकांनो योग्‍य निर्णय घ्‍या. असे आवाहनही त्‍यांनी केले.याप्रसंगी आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, आ.आशुतोष काळे, मौलाना रऊफ, सुरेंद्र थोरात यांचीही भाषण झाली. सभेपुर्वी राहाता शहरातून भव्‍य रॅली काढण्‍यात आली. या रॅलीमध्‍ये मंत्री विखे पाटीलही दुचाकीवर बसून सहभागी झाले होते. व्‍यासपीठावर येताच लाडक्‍या बहीणींनी मंत्री विखे पाटील यांचे राख्‍या बांधून त्‍यांचे स्‍वागत केले.आमच्‍याकडे दशहत असती तर, संगमनेर साखर कारखान्‍याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ यांच्‍या भावाला पंचायत समितीच्‍या इमारतीचे काम आम्‍ही करु दिले असते का? उद्योपती मालपाणींना शिर्डीमध्‍ये साईतिर्थ पार्क उभा करावसा वाटला असता का? तुमचे भाऊ इंद्रजित थोरात यांनी राहाता तालुक्‍यात कोणालाही कमीशन न देता २० कोटी रुपयांचे कामे केली आहेत, मग त्‍यांना कोणती दहशत वाटली. तुमच्‍या तालुक्‍यातील लोकांचे प्रपंच आमच्‍या तालुक्‍यातुन सुरु आहेत. याचा मलाही आनंद वाटतो.

You Might Also Like

रक्षकच निघाले भक्षक ; अन् गरिबांना फसवणारा निघाला पोलीस उपअधीक्षकांचा अंगरक्षक ?

पालिका निवडणुकांना पुढे ढकलणार ? प्रभाग रचना कार्यक्रमातून सगळंच स्पष्ट होणार…..

महापालिका निवडणुका जाहीर ; कसा असेल कार्यक्रम.?

पोलीस उपअधीक्षकांवर गोळीबार करणारा आरोपी जिल्हा रुग्णालयातून पसार ; पोलिसांच्या हातावर तुरी देत असा झाला पसार…..

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article पद मिळाले नाही म्हणून घर मोडायचे असतं का? शरद पवारांचे अजितदादांवर जोरदार टीका, सभा गाजवली.
Next Article श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का, माजी आमदार राहूल जगताप यांचा अपक्ष उमेदावारी अर्ज दाखल.
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?