कोपरगाव : पतीने पत्नीच्या डोक्यात हातोडा घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात असलेल्या जेऊर पाटोदा शिवारात घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा शिवारात आज दुपारच्या सुमारास हि धक्कादायक घटना घडली आहे. पूजा अरुण दाभाडे असे मयत विवाहितेचे नाव आहे. पूजा ही पतीसह जेऊर पाटोदा परिसरात वास्तव्यास होती. दरम्यान आज दुपारी दोघांमध्ये काही वाद झाल्यानंतर पतीने पूजाच्या डोक्यात हातोडा मारला होता. यात पूजाचा मृत्यू झाला आहे.