TIMES OF AHMEDNAGAR
राजस्थान उच्च न्यायालयाने एका ३३ वर्ष जुन्या बलात्काराच्या खटल्यात निर्णय देताना केलेलं विधान सध्या प्रचंड चर्चेत आहे. मुलीचे अंतर्वस्त्र काढणे स्वतः नग्न होणे या कृती बलात्काराचा प्रयत्न म्हणून गृहीत धरता येणार नाहीत. असे न्यायालयाने स्पष्ट म्हटले आहे. भारतीय दंडसंहितेच्या कलम ३५४ अंतर्गत हा प्रकार महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न म्हणून गुन्हा मानला जाईल पण यास बलात्कार म्हणता येणार नाही असेही पुढे न्यायाधीशांनी म्हंटले केले.





