Reading:अडीच वर्षांची कमाई तिच्यावर खर्च करून देखील तिने धोखा दिल्याने त्याने तिचा गळा चिरून खून केला, पोलिसांना म्हणाला एक खून करणाऱ्याचा एन्काऊंटर होत नाही……….
अडीच वर्षांची कमाई तिच्यावर खर्च करून देखील तिने धोखा दिल्याने त्याने तिचा गळा चिरून खून केला, पोलिसांना म्हणाला एक खून करणाऱ्याचा एन्काऊंटर होत नाही……….
TIMES OF AHMEDNAGAR | INDIA | UTTAR PRADESH | BULANDSHAHR | BOYFRIEND KILLS GIRLFRIEND BY SLITTING HER THROAT AND CONFESSES TO POLICE | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
मला धोका दिला, म्हणून मी तिचे मुंडकेच छाटले, असा कबुली जबाब एका आरोपीने पोलिसांना दिला आहे. आरोपीचा जबाब ऐकून पोलीसही पुरते हादरुन गेले आहेत. ही घटना घडली उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये एका तरुणाने त्याच्या प्रेयसीचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी प्रकरणाचा पुढचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी आरोपी अदनानला अटक केली आहे. महत्त्वाची आणि धक्कादायक बाब म्हणजे, त्याने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबुल केला आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
तिने माझी फसवणूक केली म्हणून तिचा गळाच चिरला….
मंगळवारी सकाळी उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये स्थानिक लोकांना खुर्जाच्या मोहल्ला खीरखानी येथील स्मशानभूमीत एका महिलेचा मृतदेह आढळला होता. मृत महिलेची ओळख पटली असून आस्मा (वय ३०, रा. मोहल्ला नई बस्ती, खुर्जा नगर) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवला आहे. यामध्ये त्याने धक्कादायक वक्तव्य केले आहे. आरोपी अदनानने नोंदवलेल्या जबाबाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आरोपीने जबबात म्हटल्यानुसार, त्याने आपली अडीच वर्षांची कमाई त्याच्या प्रेयसीवर खर्च केली होती, मात्र तिने त्याची फसवणूक सुरू केली आणि फसवणुकीची शिक्षा मृत्यूदंड आहे. अदनानने सांगितले की, जेव्हा त्याच्या प्रेयसीने त्याला धोका दिला, तेव्हा त्याने चाकूने तिचा गळा चिरला आहे. तो संजू मधील संजय दत्तच्या स्टाईलमध्ये बल्लू बल्लू करत होता. अदनानचे विवाहित अस्मासोबत अवैध संबंध होते, असेदेखील त्याने सांगितले आहे. आस्माचे आणखी कोणाशीही प्रेमसंबंध होते, ती मला फसवत होती, त्यामुळे तिचा खून करून मी मृतदेह स्मशानभूमीत फेकून दिला, असेही आरोपीने जबाबत सांगितले आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
दहा हत्या करणाऱ्याचा एन्काउंटर केला जातो….
आरोपी अदनान म्हणाला की, मैत्री आणि प्रेमात जो कोणी धोका देईल, त्याची हत्या केली जाईल. त्यासोबतच जर कोणी त्यांच्या कुटुंबाकडे डोळे वर करुनही पाहिले, तर मात्र त्यांची खैर नाही. तसेही एक हत्या करणाऱ्याचा कोणी एन्काउंटर थोडी करत असते. दहा हत्या करणाऱ्याचा एन्काउंटर केला जातो. मी तर आता एकच हत्या केली आहे. आरोपीचा हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी आरोपीला महिलेच्या मृत्यूसाठी अटक केली आहे. याप्रकरणी आणखी तपास सुरू आहेत.