बॉलीवूडचा किंग आणि प्रशासनाचा सिंघम पुन्हा भिडले ? आर्यन खान केस नंतर वानखेडे पुन्हा चर्चेत.
बॉलीवूडचा किंग शाहरुख खानचा जवान सिनेमा चांगलाच गाजला. चार वर्षाच्या फ्लॉप विश्रांतीनंतर २०२३ मध्ये बेशरम रंगाच्या वादात सापडून,प्रेक्षकांना झुमे जो पठाणच्या तालावर नाचवत शहारुख खानच्या पठाण या चित्रपटाने हजारो कोटींचा गल्ला जमवला.त्या नंतर ५८ वर्षांच्या शाहरुखने अजूनही तरुण असल्याचे भासवत नवीन सिनेमा जवान प्रेक्षकांच्या भेटीला आणला. “बेटे को हाथ लगाने से पहले,बापसे बात कर ” या डायलॉगवर जवान गाजला. आणि जवानणे देखील १००० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. जवान सिनेमा २०२३ चा एक ब्लॉकबस्टर सिनेमा म्हणून ओळखला जातो.
बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर. या डायलॉगबद्दल बोलतांना शाहरुखचे चाहते सांगतात की हा डायलॉग खास NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्यासाठी बनवण्यात आला आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये असलेला हा डायलॉग जेव्हा सिनेमात ऐकायला मिळाला तेव्हा लोकांनी एकच जल्लोष केला. या डायलॉगबद्दल NCB अधिकारी समीर वानखेडेंनी त्यांचं मत मांडलंय.
रोडछाप डायलॉग – वानखेडे.
शाहरुख खानचा ‘जवान’ मधला “बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर” हा डायलॉग चांगलाच व्हायरल झाला होता. या एका सध्या डायलॉगने शाहरुख खान याला हजारो कोटी कमावून दिले खरे पण या डायलॉगने अजून एका मोठ्या अधिकाऱ्याला नवीन ओळख देऊन चर्चेत आणल्याचे बोलले जाते. ते अधिकारी म्हणजे समीन वानखेडे. वानखेडेंनी अमली पदार्थ प्रकरणात आर्यन खानला अटक केली होती. त्यामुळे हा डायलॉग त्याला उद्देशून आहे असं अनेकांनी गृहीत धरलं होत.अखेर या प्रकरणातील आर्यनच्या प्रकरणातील तपास अधिकारी समीर वानखेडे यांनी या संवादावर प्रतिक्रिया दिली आहे. शाहरुखच्या ‘जवान’मधील डायलॉगचे वर्णन समीर वानखेडेंनी “रोडछाप” असे केले होते.
शाहरुख खानच्या ‘जवान’ मधील त्या डायलॉगवर प्रतिक्रिया विचारली असता समीर म्हणाले. , “हा संवाद मला अगदी रस्त्याच्या कडेला सडकछाप लोकं जशी भाषा बोलतात तसा वाटतो. मी ना चित्रपट पाहिलाय ना कुठला संवाद ऐकलाय. मला या चित्रपटाबद्दल काहीच माहिती नाही. पण जर कोणी माझ्यावर हा निशाणा साधले असेल, तर मला इंग्रजीत प्रतिक्रिया द्यायला आवडेल.”समीरने शेवटी म्हणाले, “मी बरीच घरे आणि पूल जाळले आहेत आणि मी त्या जळलेल्या घरांवर आणि पुलांवर नाचलो आहे. म्हणून मला नरकाची भीती वाटत नाही, म्हणून कृपया मला घाबरू नका. आर्यनच्या प्रकरणातील तपास अधिकारी समीर वानखेडे यांनी या संवादावर प्रतिक्रिया दिली आहे. शाहरुखच्या ‘जवान’मधील डायलॉगचे वर्णन समीर वानखेडेंनी “रोडछाप” असे केले होते.
समीर वानखेडे कोण आहेत ?
समीर वानखेडे २००८ च्या बॅचचे भारतीय महसूल सेवेतील (IRS) अधिकारी आहेत. भारतीय महसूल सेवेत येण्याआधी २००६ साली ते पहिल्यांदा केंद्र सरकारच्या सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशनमध्ये (Central Police Organization) मध्ये रूजू झाले होते. CPO मध्ये केंद्रीय गुप्तचर विभाग, सीबीआय (CBI), नॅशनल क्राइम रिकॉर्ड ब्यूरो (NCRB), नॅशनल डिजास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF), नॅशलन इनव्हेस्टिगेटिंग एजेंसी (NIA) यांसारखे विविध विभाग येतात.त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा पास झाल्यानंतर समीर वानखेडे भारतीय महसूल सेवेत रुजू झाले होते.भारतीय महसूल सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांची नियुक्ती कस्टम विभागात करण्यात आली. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहायक आयुक्त (Assistant Commissioner Customs) म्हणून समीर वानखेडे यांनी काही वर्षं काम केलं.त्यानंतर महसूल गुप्तचर संचलनालय (DRI) आणि दहशतवादी कारवायांशी संबंधित प्रकरणांचा तपास करणाऱ्या नॅशनल इनव्हेस्टिगेटिंग एजन्सीतही (NIA) त्यांनी काम केलंय.ऑगस्ट २०२० मध्ये समीर वानखेडे यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई विभागाचे संचालक म्हणून कार्यभार स्वीकारला. त्याच वर्षी वानखेडे यांना केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे उत्कृष्ठ तपासासाठीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
१० वर्षानंतर घटस्फोट झाला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर अनेक आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंचा जन्माचा दाखला ट्विटरवर शेअर केला. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने समीर वानखेडे हिंदू आहेत की मुसलमान याची जोरदार चर्चा सुरू आहे.त्याचं खरं नाव ‘समीर दाऊद वानखेडे’ असं असल्याचा दावा मलिक यांनी केला होता.या आरोपांना उत्तर देताना माध्यमांशी बोलताना समीर वानखेडे म्हणाले, “मी हिंदू आहे. माझे वडीलही हिंदू आहेत. माझी आई मुस्लीम होती. पण आईवडिलांनी दोघांनी धर्म बदलला नाही.समीर वानखेडेंच्या आईचं नाव झहीदा असून २०१५ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. मी धर्मनिरपेक्ष कुटुंबातून येतो,असं समीर वानखेडे बोलताना सांगतात. समीर वानखेडेंवर होणाऱ्या आरोपांचं खंडन करण्यासाठी त्यांचे वडीलही प्रसारमाध्यमांसमोर आले होते. ते म्हणाले माझं नाव दाऊद नाही. माझं नाव ज्ञानदेव कचरुजी वानखेडे आहे. समीर वानखेडेंचा निकाहनामा नवाब मलिक यांनी सार्वजनिक केला. या निकाहनाम्यात समीर वानखेडेंचं नाव ‘समीर दाऊद वानखेडे’ असं लिहीण्यात आलंय. मग निकाहनाम्यात नाव दाऊद का ? यावर बोलताने ते म्हणतात, प्रेमाने माझी पत्नी मला दाऊद म्हणून हाक मारायची. त्यांनी तसं नाव ठेवलं असेल.२००६ मध्ये समीर वानखेडे यांचं लग्न डॅा. शबाना कुरैशी यांच्यासोबत झालं होतं. पण १० वर्षानंतर त्यांनी २०१६ साली घटस्फोट घेतला होता.