६०० गाड्यांचा ताफा घेऊन महाराष्ट्रात वातावरण गरम करणारे KCR झाले गार. कामारेड्डी मतदार संघात KCRची हार
पाच वेळा आमदार असलेले तत्कालीन काँग्रेसच्या नेत्याला पराभूत करणारे रेवंत रेड्डी यांनी आज काँग्रेसची सत्ता का आणली ?
तेलंगणात काँग्रेस पक्षाला अच्छे दिन आणणारे रेवंत रेड्डी आहेत तरी कोण ?
कोण आहेत रेवंत रेड्डी
सध्या रेवंत रेड्डी यांच्याकडे तेलंगणा प्रदेश काँग्रेस युनिटचे अध्यक्षपद आहे. त्यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९६७ रोजी अविभाजित आंध्र प्रदेशातील कोंडारेड्डी पल्ली, नगरकुर्नूल येथे झाला. रेवंत यांच्या वडिलांचे नाव अनुमुला नरसिंह रेड्डी आणि आईचे नाव अनुमुला रामचंद्रम्मा आहे. त्यांनी हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठाच्या ए.व्ही. कॉलेजमधून शिक्षण घेतले. ते कला शाखेत पदवीधर आहेत. तेलंगणा काँग्रेसचे अध्यक्ष असलेले रेवंत रेड्डी या निवडणुकीत पक्षाचा प्रमुख चेहरा राहिले आहेत. जर काँग्रेस पक्ष तेलंगणात सत्तेत आला तर रेवंत रेड्डी हेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील असे मानण्यात येत होते. रेवंत रेड्डी हे १७ व्या लोकसभेचे सदस्य आहेत. मल्काजगिरी मतदारसंघातून विजय मिळवत त्यांनी संसद गाठली. याआधी रेड्डी हे चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपी पक्षात होते. टीडीपीकडून आमदारकी लढवताना रेड्डी यांनी पाच वेळा आमदार असलेले तत्कालीन काँग्रेस नेते गुरुनाथ रेड्डी यांचा पराभव केला होता. २०१४ सालीही त्यांनी याच मतदारसंघातून विजय मिळवला होता. यानंतर २०१७मध्ये त्यांनी टीडीपीला सोडचिठ्ठी देत काँग्रेसचा हात पकडला. काँग्रेसने रेवंत रेड्डी यांना २०२१मध्ये प्रदेशाअध्यक्ष केले.
ABVP मधून रेड्डींची सुरुवात
रेवंत रेड्डी यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून केली होती. पुढे २००७ साली रेड्डी यांना अपक्ष उमेदवार म्हणून आंध्र प्रदेश विधानपरिषदेवर सदस्य म्हणून संधी मिळाली. आता ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असून मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत.
तेलंगणाच्या विजयानंतर पुढे काँग्रेसचे काय होईल ?
चार राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. यामध्ये एकमेव दक्षिण राज्याचा समावेश आहे. तेलंगणात कॉंग्रेसने जोरदार मुसंडी मारलेली आहे.कर्नाटकनंतर आणखी एक दक्षिणी राज्यात कॉंग्रेसचे सरकार येऊ शकते.