वीज बिलाच्या वादातून खून ; गणपतीने शिवीगाळ केली आणि अब्दुलने गणपतीला संपवले …….
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | MUMBAI | ONE KILLED FOR NON-PAYMENT OF ELECTRICITY BILL | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
बिल भरण्यावरून झालेल्या वादातून भाडेकरूने घरमालकाचा हातोड्याने खून केला. गोवंडी येथे ही घटना घडली आहे. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या घरमालकाचा राहत्या घरात मृत्यू झाला आहे. दोन दिवसांनंतर घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ६३ वर्षीय आरोपीला शिवाजी नगर पोलिसांनी अटक केली आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
राहत्या घरातून दुर्गंधी येत होती.
गणपती झा (४९) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते बैंगनवाडी परिसरात रहायचे. गुरूवारी बैंगनवाडी येथे त्यांच्या राहत्या घरातून दुर्गंधी येत असल्यामुळे स्थानिकांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता गणपती झा याचा दोन दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर मृत व्यक्तीचा चुलत भाऊ दिनेश झा याने परिसरात चौकशी केली असता वीज बिलाच्या वादातून त्याचे भाडेकरू अब्दुल शेख (६३) याच्यासोबत भांडण झाले होते. त्या वादातून शेखने लाकडी दांडक्याने व हातोड्याने गणपतीला मारहाण केल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यानुसार दिनेश झा याने याबाबत शिवाजी नगर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून अब्दुल शेखला अटक केली आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
रागाातून शेखने जिन्यावर चढून गणपतीला लाकडी दांडक्याने मारहाण केली.
३० एप्रिलला वीज बिलावरून गणपती व अब्दुल शेख यांच्यात वाद झाला होता. त्यातून गणपतीने शेखला शिवीगाळ केली. त्या रागाातून शेखने जिन्यावर चढून गणपतीला लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्याचा प्रतिकार केला असता आरोपीने कमरेला लावलेली हातोडी काढली व गणपतीच्या तोंडावर मारली. त्यावर गणपती गंभीर जखमी झाला होता. तो आपल्या घरी गेला. त्यानंतर दोन दिवसांनंतर राहत्या घरात तो मृतावस्थेत सापडला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.