काल मतदान प्रक्रिया पार पडली. बहुतांश भागात चांगल्या प्रकारे मतदान झाले आहे. दरम्यान, मतदान झाल्यानंर एक्झिट पोल हाती आले आहेत. यामध्ये पुन्हा महायुतीला जास्त जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, एक्झिट पोल काहीही असले तरी जनतेचा कौल महायुतीच्या बाजूने आहे. २३ नोव्हेंबरला महायुतीच्या १६० सीट पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून निवडून येणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठीच्या २८८ मतदारसंघात काही अपवाद वगळता शांततेत व सुरळीत मतदान प्रक्रिया पार पडली आहे. राज्यात ५ वाजेपर्यंत झालेल्या मतदानात ५८.२२ टक्के मतदान झालं आहे. त्यामुळे, लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभेला मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला मोठा फटका बसला होता. तब्बल ४२ जागांवरुन भाजप महायुती केवळ १७ जागांवर आल्याची पाहायला मिळालं आहे. पण, विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला पुन्हा सत्ता मिळणार असल्याचा अंदाज सर्वेक्षणातून समोर आला आहे. मतदानानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलमधून महायुतीला बहुमताचा आकडा गाठता येऊ शकतो, असा अंदाज आहे. १० संस्थांचा सरासरी अंदाज पाहता महायुतीला १३९ ते १५६ जागा मिळण्याची शक्यता आहे. राज्यात महायुतीला १३९ ते १५६ जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तर, महाविकास आघाडीला ११९ ते १३६ जागांवर यश मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एकूण १० संस्थांच्या सर्वेक्षणातून ही बेरीज काढण्यात आली आहे. या १० संस्थांचा सरकारी एक्झिट पोल पाहिल्यास महायुतीला १३९ ते १५६ जागांवर विजय मिळू शकतो. तर, महाविकास आघाडीला ११९ ते १३६ जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे. तर, इतर व अपक्ष मिळून कमीत कमी २ ते जास्तीत जास्त २९ जागा मिळतील असा अंदाज आहे.