पत्नीला विष पाजून मारलं,अन् तो थेट नेपाळला निघाला होता.
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR CRIME NEWS | SRIGONDA POLICE | PHOTOS USED IN THIS NEWS ARE ARCHIVAL FOOTAGE. | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.|
पतीने पत्नीस विष पाजून संपवल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. अनैतिक संबंधास विरोध केल्याने पतीने क्रूरतेचा कळस गाठला. ही घटना रविवारी (दि. ११) श्रीगोंदा येथे घडली.
(संग्रहित दृश्य.)
तिला मारहाण करत विषारी औषध पाजले होते.
खून करून नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या बापू झुंबर दातीर याला श्रीगोंदा पोलिसांनी सुपा (ता. पारनेर) येथे डोंगरात पाठलाग करून पकडले आहे. मृत संगीता बापू दातीर (वय ५०, रा. चोराची वाडी, ता. श्रीगोंदा) यांनी पती बापू झुंबर दातीर (रा. सप्रेवाडी, ता. श्रीगोंदा) याला बाहेरील महिलेशी संबंध ठेवू नयेत असे समजावून सांगितले होते. मात्र या गोष्टीचा राग मनात ठेवून आरोपीने तिला मारहाण करत विषारी औषध पाजले होते. गंभीर अवस्थेत असलेल्या संगीता यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रभाकर निकम तपास करत होते. सोमवारी (दि. १२) दुपारी खबऱ्याकडून आरोपीचा शोध घेतला असता आरोपीस सुपा परिसरातील डोंगरात पाठलाग करून पकडण्यात आले आहे. आरोपी नेपाळ येथे पळून जाण्याच्या तयारीत होता. आरोपीस पकडण्यात पोलिस हवालदार मुकेश बडे, गोकुळ इंगवले, आनंद मैड, शरद चोभे, संभाजी गर्जे यांचे पथक तैनात होते.