अहमदनगर जिल्ह्यात शिक्षकावर लाकडी दांडक्याने प्राणघातक हल्ला करून शिक्षकाचा केला खून.
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | KARJAT TEACHER'S MURDER NEWS | CRIME NEWS, AHMEDNAGAR | PHOTOS USED IN THIS NEWS ARE ARCHIVAL FOOTAGE. | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अहमदनगर : मिरजगाव-कर्जत रस्त्यावर चिंचोली काळदातजवळ शिक्षकावर लाकडी दांडक्याने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. समवेत दुचाकीवर असलेली पत्नी आणि दोन मुले मात्र या हल्ल्यातून बचावले आहेत. ही घटना सोमवारी (दि.१२) रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास घडली आहे.
(संग्रहित दृश्य.)
लवकरात लवकर आरोपींच्या मुसक्या आवळू
कर्जत शहरातील कोटा मेंटॉर्स या संस्थेतील शिक्षक अशोक प्रभाकर आजबे (वय ३३, रा. शिराळ, ता. आष्टी, जि. बीड, हल्ली रा. कर्जत) हे पत्नी आणि दोन मुलांसह मिरजगाव-कर्जत रस्त्यावरून कर्जतच्या दिशेने येत होते. चिंचोली काळदात गावाजवळील लवणात आले असता मागून दुचाकीवर येणाऱ्या आरोपींनी लाकडी दांडक्याने त्यांच्या डोक्यावर पाठीमागून जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात अशोक आजबे यांचा मृत्यू झाला आहे.
याबाबत त्यांच्या मामाने खबर दिलीअसता रात्री उशिरापर्यंत फिर्याद नोंदविण्याचे काम सुरू होते. आरोपींच्या शोधार्थ पोलिस पथके रवाना झाली असून यातील एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याचे समजते. उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यानी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील पुढील तपास करत आहेत. आरोपीच्या शोधार्थ पोलिस पथके रवाना झाली आहेत. लवकरात लवकर आरोपींच्या मुसक्या आवळू, असे पाटील यांनी म्हंटले आहे.