चांगले वडील-मुलीचे नाते त्यांच्या मुलींचा आत्मविश्वास वाढवते आणि त्यांना स्वाभिमानासाठी चांगला पाया प्रदान करते . असेही सुचवले जाते की त्यांच्या वडिलांसोबत मजबूत आणि निरोगी नातेसंबंध असलेल्या मुली लवकर लैंगिकदृष्ट्या सक्रिय होण्याची शक्यता कमी असते आणि किशोरवयीन गर्भधारणा होण्याची शक्यता कमी असते.
वडिलांच्या सातत्यपूर्ण उपस्थितीच्या अनुपस्थितीमुळे त्याग, नकार आणि कमी आत्म-मूल्याची भावना होऊ शकते. बाप नसलेल्या मुलींना त्यांची ओळख, विश्वास आणि जवळीक तसेच सकारात्मक पुरुष आदर्श नसल्यामुळे संघर्ष करावा लागतो.
मुलीने जन्म घेतला की लक्ष्मी येते असे आपण मानतो. आजच्या युगात मुलगी मुलाच्या खांद्याला खांदा लाऊन अनेक जबाबदाऱ्या स्विकारत आहे. वडील आणि मुलीचं नातं सर्वात पवित्र मानले जाते.आपल्या मुलीसाठी वडील अनेक कष्ट करतात. काही नराधम अशे असतात कि आपली वासना भागवण्यासाठी स्वतःच्याच मुलीवर बलात्कार करण्यासारखे घाणरडे कृत्य केल्याच्या घटना समोर येतात. वडील मुलीच्या पवित्र नात्याला काळिमा फसला जाईल असे कृत्य काही नराधम करतात. हे पवित्र नातं बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. आता अशीच काही मनाला चटका लावणारी घटना समोर आली असून, एका पोलिसाने चक्क आपल्याच पोटच्या लेकीवर बलात्कार केला आहे. तर, वडिलांच्या नेहमीच्या या अत्याचाराला कंटाळून पिडीत मुलीने पोलीस ठाण्यात धाव घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर झालेल्या अत्याचाराची संपूर्ण माहिती दिली.
पोटाच्या १३ वर्षीय लेकरावर तुटून पडला.
पोटच्या अल्पवयीन (१३ वर्षीय) मुलीवर एका वडिलाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. मुलीने दिलेल्या तक्रारीवरून तिच्या नराधम वडिलांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (376) (लैंगिक अत्याचार) आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यानुसार (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी पोलिस कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, “कोलकात्याच्या दक्षिणेकडील बेहाला येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली असून, तो स्वतः पोलीस सेवेत कार्यरत आहेत. त्याच्यावर आपल्या स्वतःच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, ज्या पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्याच पोलीस ठाण्यात तो हवालदार पदावर कार्यरत आहे. आरोपीच्या १३ वर्षीय मुलीने पोलीस ठाण्यात धाव घेत दिलेल्या फिर्यादीनुसार वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.