शिंदे गटातील त्या खासदाराने लोकसभा निवडणुकीतील आपल्या पराभवासाठी अयोध्येतील राम मंदिराला ठरवले….
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | SHIRDI | SHINDE GROUP | FORMER MP SADASHIV LOKHANDE | LOKHANDE HAS SAID THAT RAM TEMPLE IN AYODHYA WAS THE REASON FOR HIS DEFEAT | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अयोध्येत बांधण्यात आलेल्या श्रीराम मंदिरांचा भाजपला राजकीय फायदा होणार असे गणित मांडले जात होते. विरोधकांकडून यासंबंधी आरोपही केले जात होते. मात्र शिर्डीतील महायुतीचे पराभूत उमेदवार माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी वेगळेच विश्लेषण केले आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
सदाशिव लोखंडे यांचे वेगळेच विश्लेषण….
माजी खासदार सदाशिव लोखंडे मूळचे जामखेड तालुक्यातील आहेत. पूर्वी ते कर्जत-जामखेडमधून आमदार होते. त्यामुळे अलिकडेच त्यांनी कर्जतला भेट दिली आहे. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले होते. शिर्डीत आपला पराभव का झाला ? याचे काय कारणे असावीत ? असा प्रश्न पत्रकारांनी त्यांनी विचारला होता. तेव्हा लोखंडे म्हणाले कि शिर्डी मतदारसंघात आदिवासी पट्टा आहे. तेथे रावणाला मानणारे बरेच आदिवासी आहेत. त्यांना राममंदिर रुचलेले दिसत नाही. त्याचा फटका मतदानाला बसला आहे. याशिवाय त्या मतदारासंघात राजकीय गटतट मोठे आहेत. कारखानदारांच्या साम्राज्यांचे गटतट आहेत. त्यांच्यात कमालीचा संघर्ष आहे, त्यांच्या संर्घषात माझा बळी गेला आहे. असे सांगून लोखंडे यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील राजकीय संघर्षामुळेही आपला पराभव झाल्याकडे लक्ष वेधले आहे.