मुलगी अंतर जातीय विवाह करणार हे समजताच आई – वडिलांनीच केला मुलीचा खून.
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | PARBHANI | CRIME NEWS | THE PARENTS COMMITTED THE MURDER OF THE GIRL | POLICE INVESTIGATION UNDERWAY | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
प्रेम विवाहाला विरोध करत आई – वडिलांनी पोटच्या मुलीची गळा आवळून हत्या केली आहे. परभणीच्या पालम तालुक्यातील नाव्हा येथे २१ एप्रिल रोजी ही घटना घडली आहे. या घटनेला दहा दिवस उलटून गेल्यानंतर हत्येचे प्रकरण उजेडात आलं आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
इतर जातीय तरुणाशी विवाह म्हणून केला खून !
इतर जातीच्या मुलासोबत विवाह का करतेस ? म्हणून परभणीत १९ वर्षीय मुलीचा जन्मदात्यानेच खून केला आहे. २१ एप्रिल रोजी ही घटना घडल्याचे सांगितल जातंय. त्यानंतर कोणालाही थांगपत्ता लागू न देता भावकीतील निवडक लोकांच्या उपस्थितीत मयत मुलीचे प्रेत रात्री जाळून पुरावा नष्ट करण्यात आला होता,मात्र पोलिसांना या घटनेची गुप्त माहिती प्राप्त झाल्याने हत्येचे प्रकरण उजेडात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी वडील बाळासाहेब भीमराव बाबर, आई रुक्मिणीबाई बाळासाहेब बाबर, गंगाधर योगाजी बाबर, राजेभाऊ रखमाजी बाबर, अशोक रुस्तुमराव बाबर, रुस्तुमराव दत्तराव , अशोक बाबर , आबासाहेब बाबर, अच्यूत बाबर, गोपाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गंगाखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.