खाजगी जागेवर घरकुल उभारणारे दोषी ग्रामसेवक, तलाठी यांच्यावर कारवाई करावी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मागणी.
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | ZILLA PARISHAD AHMEDNAGAR | GHARKUL SCAM AHMEDNAGAR | REPUBLICAN PARTY OF INDIA, AHMEDNAGAR |USED IN THIS NEWS ARE ARCHIVAL FOOTAGE. | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अहमदनगर – सन २०१७-१८ मध्ये दरेवाडी (ता. नगर) येथे रमाई आवास योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) च्या वतीने करण्यात आली आहे. रिपाईच्या शिष्टमंडळाच्या वतीने सदर मागणीचे निवेदन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे. यावेळी ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष विजय शिरसाठ, कार्याध्यक्ष विकास पटेकर, अजय बडोदे आदी उपस्थित होते.
(संग्रहित दृश्य.)
अधिकाराचा गैरवापर करुन लाभार्थी व शासनाची फसवणुक
नगर तालुक्यातील दरेवाडी गावात सुनील धोत्रे यांची जमीन आहे. धोत्रे यांच्या खासगी जमीनीवर गावातील ग्रामसेवक, तलाठी व सरपंच यांनी संगणमत करून अनुसूचित जमातीतील लाभधारकांना घरकुल मंजूर करून घेतले. एवढ्यावर न थांबता धोत्रे यांच्या जागेवर घरकुल बांधून बांधकाम पूर्ण करून पूर्णत्वाचा दाखलाही दिला आहे. तर घरकुलांची संपूर्ण रक्कम वर्ग देखील केली आहे. या सर्व व्यवहारात मूळ जागा मालकाला काहीही कल्पना न देता आपल्या अधिकाराचा गैरवापर करुन लाभार्थी व शासनाची फसवणुक करण्यात आली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. धोत्रे यांच्या जागेत उभारलेले अनाधिकृत घरकुल बाबतचा संपूर्ण अहवाल द्यावा, खाजगी जागेवर घरकुल उभारणारे दोषी ग्रामसेवक, तलाठी यांच्यावर कारवाई करावी, सदर प्रकरण अतिशय गंभीर असून त्याची चौकशी व्हावी आणि घरकुलचे अतिक्रमण हटवून मुळ मालकाला जागा मोकळी करून देण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली आहे.