Reading:राज्य सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला आव्हान देणारी याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.
राज्य सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला आव्हान देणारी याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.
TIMES OF AHMEDNAGAR | BOMBAY HIGH COURT | STATE GOVT | THE GOVERNMENT REJECTED | THE APPLICATION REGARDING THE NAME CHANGE OF AURANGABAD AND OSMANABAD | CHIEF JUSTICE DEVENDRA UPADHYAY | JUSTICE ARIF DOCTOR | SUPREME COURT | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
राज्य सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला आव्हान देणारी याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय व न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांनी हा निकाल दिला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील दोन्ही शहरांचे नामांतरण कायम राहणारे असल्याने राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.मागच्यावर्षी राज्य सरकारने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबदचे धाराशीव असे नामांतर करण्याचा निर्णय घेतला होता. त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांसमोर २०२३ च्या ऑक्टोबर महिन्यात सुनावणी पूर्ण झाली होती. मात्र न्यायालयाने याबाबतचा निर्णय रोखून ठेवला होता. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाकडून आज निर्णय घेण्यात आला आहे.
स्त्रोत सोशल मिडिया.
नामांतर विरोधी याचिका करण्याचा कोणताही हक्क नव्हता,
राज्य सरकारने शहरांच्या नामांतराबाबत घेतलेला निर्णय महसूल विभागाकरीता आहे. या निर्णयामुळे कोणाचेही कोणतेही नुकसान होणार नाही असे निरीक्षण यावेळी उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. याचिका देणाऱ्यांचे वकील सतीश तळेकर यांनी या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. याचिकाकर्त्यांना नामांतर विरोधी याचिका करण्याचा कोणताही हक्क नव्हता, असे न्यायालयाने सुनावल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यापूर्वी नामांतराच्या निर्णयाविरोधात सन १९९८ मध्ये सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. त्यावेळी न्यायालयाने स्थगिती दिली होती, याची आठवण तळेकर यांनी करुन दिली आहे.
राज्यातील विविध शहरांची नावे बदलण्याचा सरकारचा निर्णय.
उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री पदी आल्यानंतर त्यांनी राज्यातील विविध शहरांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्रातदेखील मुख्य मंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे नामांतर धाराशीव व अहमदनगरचे नामांतर अहिल्याबाई होळकर नगर करण्याचा निर्णय घेतला होता.
स्त्रोत सोशल मिडिया.
नामांतरणाला एक लाखापेक्षा अधिक अर्जातून पाठिंबा देण्यात आला.
औरंगाबाद जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्हा अशा दोन्ही जिल्ह्यांची नामांतरणाची अधिसूचना राज्य सरकारने २७ फेब्रुवारीला काढून छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असे केले आहे. राज्यामध्ये २७ मार्च ही दोन्ही शहराच्या नामांतराबाबत आक्षेप घेण्यासाठी राज्य सरकारने अंतिम मुदत दिली होती. त्याबाबत ६०,००० पेक्षा अधिक आक्षेप घेणारी पत्रे आणि अर्ज विभागीय आयुक्त यांच्याकडे दाखल झाली होती. तर नामांतरणाला एक लाखापेक्षा अधिक अर्जातून पाठिंबा देण्यात आला होता. सर्वप्रथम महाविकास आघाडी सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद दोन्ही शहरांचे नाव बदलण्याचा निर्णय जून २०२२ मध्ये घेतला होता. मात्र शिवसेनेतील फुटीनंतर महाराष्ट्र विकास आघाडी सरकार कोसळले. नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नामांतराणाचा आधीचा निर्णय हा बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. मात्र, दोन्ही शहरांचे नामंतरण करण्याचे आदेश काढले आहे.