TIMES OF AHMEDNAGAR
कोल्हापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात व्यवस्थापन कोट्यातून एमबीबीएस शिक्षणक्रमासाठी प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलेकडून ३४ लाख ६१ हजार रुपये उकळनाऱ्या दोघांविरोधात मुंबई नाका पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन वामन म्हात्रे (रा. रिजेन्सी सोसायटी, दावडीगाव, डोंबिवली, ठाणे), कल्पना रघुनाथ पाटील (रा. प्रतिक रेसीडेन्सी, नाशिकरोड) असे दोघा संशयितांची नावे आहेत.
स्त्रोत.सोशल मिडिया.
व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन
विशाखा दिनकर वानखेडे (रा. सोनाली अपार्टमेंट, कॉलेजरोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या मुलाला एमबीबीएस करायचे होते. त्यासाठी त्यांना संशयितांनी कोल्हापूर येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएससाठी व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन दिले. संशयितांनी वानखेडे यांचा विश्वासही संपादन केला. या प्रवेशासाठी संशयितांनी २९ सप्टेंबर २०२२ रोजी पुणा रोडवरील हॉटेल कामत येथे ३४ लाख ६१ हजार रुपये घेतले. यानंतर प्रवेश होणे अपेक्षित असताना संशयितांकडून वानखेडे यांच्या मुलाचे एमबीबीएसला प्रवेश झाला नाही. विशाखा दिनकर वानखेडे (रा. सोनाली अपार्टमेंट, कॉलेजरोड) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.