लाडकी बहिण योजना म्हणून १५०० ची भिक नको,लाडकी बहिण संरक्षण योजना म्हणून हक्क द्या.-विद्या गाडेकर यांचा सरकारला थेट इशारा.
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | NCP (SHARADCHANDRA PAWAR) | VIDYA GADEKAR NEWS | PHOTOS USED IN THIS NEWS ARE ARCHIVAL FOOTAGE. | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
मागील काही दिवसांपासून देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहेत. काही दिवसांपूर्वी कोलकत्ता येथे डॉक्टर तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर महाष्ट्रातील बदलापूर येथे एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधात अनेक ठिकाणी आंदोलने सुरु आहेत.यातच राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) महाराष्ट्र प्रदेश सचिव (ओबीसी) विद्या गाडेकर यांनी वेगळाच संताप व्यक्त केला आहे. त्यांनी शेवगाव येथे काही फलक लाऊन सरकारवर थेट निशाना साधला आहे.
(विद्या गाडेकर यांनी लावलेले फलक. स्त्रोत सोशल मिडिया)
विद्या गाडेकर यांचे ते फलक चर्चेत
महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनेच्या विरोधात काल (२४ऑगस्ट ) रोजी महाविकास आघाडीने आंदोलन केले होते. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली होती. सरकारवर टीका करत अनेकांनी सरकारला धारेवर धरले होते. मात्र आता राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) गटाच्या नेत्या विद्या गाडेकर यांनी सरकारचा वेगळाच निषेध केला आहे. महायुती सरकारच्या निषेधात निर्दयी सरकार दहन असे फलक विद्या गाडेकर यांनी लावले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अत्याचारांच्या घटनाक्रम सांगतांना विद्या गाडेकर यांना आश्रू अनावर !
१३ ऑगस्ट बदलापूर येथील शाळेतील दोन चिमुकल्यांवर अत्याचार, १५ ऑगस्ट पुणे येथील शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न,२० ऑगस्ट अकोला येथे शिक्षकाकडून सहा मुलींचा विनयभंग,२० ऑगस्ट मुंबई (ठाणे) येथे गतिमंद मुलीवर अत्याचार,(चांदिवली) येथे चीमुकलीवर लैगिक अत्याचार, २० ऑगस्ट लातूर येथे साडेचार वर्षाच्या मुलीशी लैगिक छेडछाड, २१ ऑगस्ट नाशिक येथे साडेचार वर्षाच्या मुलीचं अपहरण करून अत्याचार, २१ ऑगस्ट मुंबई येथे अपंग अल्पवयीन मुलीवर अत्याचार, खार दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग,२१ ऑगस्ट पुणे येथे अल्पवयीन तरुणीवर मैत्रिणीच्या मदतीने दोन मित्रांनी केला अत्याचार, २२ ऑगस्ट नागपूर आठ वर्षीय मुलीवर शेजाऱ्यानेच केला अत्याचार,२२ ऑगस्ट कोल्हापूर दहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन हत्या. अशा अत्याचारांच्या घाटनेंचा पाढा वाचत विद्या गाडेकर यांना आश्रू अनावर आले, या घटना अत्यंत दुर्दैवी असल्याने भविष्यात असेच जर सुरु राहिले तर महराष्ट्रात महिलांचे जगणे कठीण होईल अशी चिंता व्यक्त करत पिडीत महिलांच्या समर्थनात धडक मोर्चा काढणार असल्याचे देखील त्यांनी टाईम्स ऑफ अहमदनगरशी बोलतांना सांगितले.