तूमच्या घरावर वाईट नजर आहे. प्रेतात्मा वाईट करण्यासाठी टपले आहेत. यावर आमच्याकडे उपाय आहे. असे सांगत मागील दोन वर्षात तब्बल ३३ लाखाचा गंडा घातल्याच्या प्रकार उजेडात आला आहे. उदगीर येथील हा धक्कादायक प्रकार असून अंधश्रद्धेच्या नावे गंडा घालणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणामुळे जिल्ह्यात सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार उदगीर शहरातील कासिम पुरात राहणाऱ्या अस्मतूनिसा जब्बारद्दीन पराकोटे या महिलेस मागील अडीच तीन वर्षापासून दोन महिलांनी भीती घातली. तुमच्या घराचे कुणीतरी वाईट करणार आहे. प्रेतात्माची नजर आहे. ही नजर दूर करायची असेल तर काही विधी करावी लागतील. त्यासाठी पैसे खर्च करण्यासाठी सांगण्यात आले. मागील दोन वर्षात १६ लाखाची रोकड आणि सोने आणि चांदी यासह तब्बल ३३ लाखापेक्षा अधिक रकमेला गंडा घालण्यात आला असल्याची माहिती पुढे आली आहे. भीती दाखवत मागील दोन वर्षांमध्ये तब्बल ३३ लाखाची रक्कम लुटली अस्मतूनिसा जब्बारद्दीन पराकोटे या महिलेस उदगीर येथील सुरया वाजिद मुंजेवार आणि हैदराबाद येथील फरीदा युसुफ शेख यांनी आपल्या गोड बोलण्यांनी जाळ्यात ओढले. वेळोवेळी घरावरील संकटाची भीती दाखवली. मागील दोन वर्षांमध्ये ३३ लाखाची रक्कम लुटली. तर जादू टोण्याचे अनेक विधी केली. मात्र काहीही उपयोग झाला नाही. हळूहळू या दोन महिलेचा बोगसगिरी वाढत चालली होती. ती लक्षात आल्यानंतर फिर्यादीने थेट उदगीर पोलीस ठाणे गाठलं आणि दोन महिलेविरोधात फसवणुकीचा तक्रार दाखल केली.
(संग्रहीत दृश्य.)
अनिष्ट व आघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध…
दरम्यान या प्रकरणी उदगीर पोलिसांनी दोन वर्षापासून होत असलेल्या फसवणुकीची माहिती घेत दोन महिलेच्या विरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ३१ ( ४) ३ (५) बीएनएस व महाराष्ट्र नरबळी अमानुष अनिष्ट व आघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालने बाबत अधिनियम २००५ कलम ३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी महिला अद्याप फरार आहेत. पोलीस सध्या पुढील तपास करत असून फरार आरोपीचा शोध घेत आहेत. मात्र या प्रकरणामुळे जिल्ह्यात सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.