अहिल्यानगर : सावेडी उपनगरात पुन्हा एकदा चेन स्नाचींग घटना घडली आहे. गुमोहर रोड येथे मंदिरात दर्शन घेऊन रस्त्याने पायी घराकडे जाणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील २ तोळे वजनाचे सोन्याचे गंठन तसेच दीड तोळा वजनाचे सोन्याचे गठणं असे दागिने चोरट्यांनी ओरबडून पोबारा केला. ही घटना (दि.२७) एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आनंद शाळेसमोरील किराणा दुकानासमोर घडली. या प्रकरणी शांताबाई रावजी सोनावणे(वय ८५ रा आनंदनगर. गुलमोहर रोड, सावेडी ) यांनी (दि.२८) एप्रिल रोजी सायंकाळी आनंदनगर येथील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. तेथून घराकडे परतत असताना सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्या पायी चालत आनंद शाळेसमोरील किरणा दुकानासमोर आल्या. त्यावेळी रस्त्याच्या कडेला तिघे जण उभे होते. ते तेथीलच रहिवासी असावेत. असे समजून फिर्यादी या पुढे जायला निघाल्या. त्यावेळी त्यातील एक जण फिर्यादी त्याच्या दिशेने अला. त्याने अचानक फिर्यादी यांच्या साडीचा पदर बाजूला करत गळ्यातील २ तोळे वजनाचे सोन्याचे गंठन तसेच दीड तोळा वजनाचे चेनमधील सोन्याचे गंथन असे दोन्ही डाग़्णी हिसका मारून तोडले व तिघेही तेथून पसार झाले अचानक झालेल्या घटनेने फिर्यादी घाबरू गेल्या व त्यांना चक्कर आली. त्यामुळे त्या तोंडावर हात ठेऊन काही वेळ तेथेच उभ्या राहिल्या त्यावेळी आसपास इतर कोणीही नव्हते. काही वेळाने फिर्यादी शांताबाई यांनी घरी जावून घडलेला प्रकार आपल्या मुलांना संगीतला त्यानंतर त्यांनी (दि.२८) एप्रिल रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात जाऊन फिर्यादी दिली . या फिर्यादीवरून पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.