मुंबईतील ३६ वर्षीय वकिल महिलेला बुधवारी दुपारी एक फोनकॉल आला. ज्यामध्ये तिच्याविरोधात एफआयआर दाखल झाला असल्याचे समोरच्या व्यक्तीने सांगितले. जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्याशी संबंधित एका प्रकरणात या महिला वकिलाचेही नाव गुंतले असल्याचे तिला सांगण्यात आले होते. नरेश गोयल यांना ईडीने आर्थिक घोटाळ्यात अटक केली होती, मात्र ते आता जामीनावर बाहेर आहेत.गोपनीय चौकशी करायची असल्यामुळे आणि पोलीस स्थानकात येण्यापेक्षा त्रयस्थ ठिकाणी चौकशी करू, असे सांगून या महिलेला पवई येथील एका हॉटेलमध्ये जाण्यास सांगितले गेले. तिथे गेल्यावर एका महिला अधिकाऱ्याकडून पीडित महिलेच्या शरीरावरील जखमा आणि काही शस्त्र बाळगले आहे का ? याची खातरजमा करण्यासाठी पीडितेला विवस्त्र होण्यास सांगितले गेले. तसेच तिच्या खात्यातून ५० हजार रुपये चोरट्यांनी आपल्या खात्यात वळविण्यास सांगितले.

Rajasthan News: Took Obscene Photo Of Rajsamand's Girl, Used To Rape Her  Daily By Threatening To Make It Viral - Amar Ujala Hindi News Live -  Rajasthan Crime News:राजसमंद की युवती की(संग्रहित दृश्य.)

पीडितेला विवस्त्र होण्यास सांगितले.

हा प्रकार सुरू असताना महिलेला आपली फसवणूक होत असल्याचा संशय आल्यानंतर तिने थेट पवई पोलीस ठाणे गाठले. सायबर चोरट्यांच्या कॉल आणि मेसेजला उत्तर न दिल्यामुळे अखेर चोरट्यांनी तिचे नग्न फोटो तिलाच पाठवून आणखी पैशांची मागणी करायला सुरुवात केली होती. पोलिसांनी सांगितले की, जेव्हा महिलेला पहिला फोन आला तेव्हा, समोरच्या व्यक्तीने तो TRAI मधून बोलत असल्याचे सांगितले होते. पीडितेचे सीम कार्ड मनी लाँडरिंग प्रकरणात वापरले गेले असून ते लवकरच ब्लॉक केले जाणार असल्याची भीती त्याने दाखविली होती. महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे कि पहिला फोन आल्यानंतर मला पवई सायबर सेलमधून दुसरा फोन आला. पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीने तो पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले होते. त्यानेच मला अटक टाळण्यासाठी हॉटेलमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता. मी घाबरले, अटक होण्याची भीतीने हॉटेलमधील रुम बुक करून तिथे गेले, असे पीडितेने सांगितले. हा फसवणुकीचा प्रकार होत असताना महिलेला याबद्दल कुणालाही माहिती न देण्याची भीती दाखवली. पवई पोलीस ठाण्यातील अधिकारी आता या प्रकरणाची चौकशी करत आहेत.