गेल्या दहा वर्षांत भारतीय जनता पक्षाने सत्तेचा गैरवापर केला. सत्तेची मस्ती त्यांच्या डोक्यात गेली आहे. भाजपच्या सत्तेचे सिंहासन आपल्याला उध्वस्त करायचे आहे. नगर जिल्हयातही अनेक प्रश्न आहेत. त्या सर्वांचे उत्तर नीलेश लंके आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांना तुम्ही दिल्लीत पाठवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
स्त्रोत.सोशल मिडिया.
सरकारची आता हुकूमशाहीकडे वाटचाल सुरु झाली आहे. – शरद पवार
यावेळी बोलताना पवार म्हणाले, निवडणूक ही सत्ताधाऱ्यांना हिशोब मागण्याची वेळ असते. तसा हिशोब सध्या आम्ही मागत आहोत. या सरकारने काहीच केले नाही. जे केले, ते सत्तेचा गैरवापर करून विरोधक आणि जनतेला त्रास देण्याचे काम केले. या सरकारची आता हूकूमशाहीकडे वाटचाल सुरू झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत आम्ही त्यांच्या सत्तेचे सिंहासन उद्धस्थ केल्याशिवाय राहणार नाही, असेही पवार म्हणाले.राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आपल्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत ३६५० दिवसात महागाई , गॅस , पेट्रोलचे भाव कमी करता आले नसल्याची टीका केली.आता मोदींची गॅरंटी चालणार नाही . विचाराच्या विरोधात जाणाऱ्यांना मोदी साहेबांनी चौकशीसंस्था मागे लावल्याचा आरोपही यावेळी पवार यांनी केला आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
वचन न पाळणारे यानिवडणूकीत गाडायचे आहे.!
नगर जिल्ह्याविषयी बोलताना पवारांनी विखे परिवारवर जोरदार टीका केली आहे. पवार म्हणाले, पदश्री विठ्ठलराव विखेंनी सहकारी साखर कारखाना काढला. पण नंतरच्या पिढीने काय केले ? त्यांची तिसरी पिढी आता राजकारणात आहे. मात्र वडीलधाऱ्यांचा मान ठेवण्याचे सौजन्यही त्यांच्याकडे नाही. नगर जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत, त्या सर्वांचे उत्तर निलेश लंके हे आहेत. त्यामुळे आम्ही हा उमेदवार दिला असून त्याला दिल्लीला पाठवा, असे आवाहन पवार यांनी केले.भाषणा दरम्यान वचनं तुम्ही पाळली नाही अन् शिव्या आम्हाला देता ? शरद पवारांनी मोदींचे भाषण मतदारांना ऐकवलं वचन न पाळणारे यानिवडणूकीत गाडायचे आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
शेतकरी विरोधी सरकार घालवण्यासाठी निलेश लंके यांना निवडून द्यायचे आहे.
राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या भाषणात महायुती सरकारवर ताशेरे ओढत म्हणाले की , महाविकास आघाडीच्या काळातील अनेक प्रकल्प या सरकारने बंद पाडले. शेतकरी विरोधी सरकार घालवण्यासाठी निलेश लंके यांना निवडून द्यायचे आहे. राहुरी तालुका काय आहे हे चार तारखेला कळेल , असे विखे यांचे नाव न घेता तनपुरे यांनी टोला लगावला आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नाही संसद बंद पाडली तर मग बोला.
यावेळी बोलताना उमेदवार लंके म्हणाले, ज्यांना शेतकऱ्यांचे नेतृत्व करण्यासाठी दिल्लीत पाठविले, त्यांनी शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला नाही. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. एकदा संधी द्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नाही संसद बंद पाडली तर मग बोला. विरोधकांनी व्यक्तिगत टीका करण्यापेक्षा विकासावर बोलावे. मतदारांनी एकदा माझ्यावर विश्वास ठेवावा. अभिमान वाटेल असे काम करून दाखवील. आमदार झाल्यावर लोकांची संपत्ती वाढते. मी कर्जबाजारी झालो, असेही लंके म्हणाले. यावेळी उमेदवार निलेश लंके यांनी आपल्या शैलीमध्ये विखे यांचे नाव न घेता त्यांचा समाचार घेतला व आपल्या शैलीची ओळख करून दिली . शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आपण खासदार झाल्यावर संसद संसदेत आवाज उठवू असे म्हणत अनेक प्रश्नांवर उहापोह केला.
स्त्रोत.सोशल मिडिया.
शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले म्हणून आम्ही गुंड का ? लंकेंचा विखेंना सवाल.
गेल्या साडेचार वर्षात माझ्या संपत्तीमध्ये घट झाली असून कर्जही वाढले समाजासाठी काम करत असताना कर्ज वाढणारच आहे. इतरांप्रमाणे आमचे इन्कमींग सुरू नाही. ते त्यांच्या राजकीय व्यासपीठावर येतात. त्यामुळे त्यांना टीका करणे क्रमप्राप्त असते.शेतकऱ्यांच्या कांद्यासाठी भावासाठी मी सरकारमध्ये सहभागी असतानाही आंदोलन केले होते. त्यामुळे माझ्यावर गुन्हे दाखल आहे. म्हणून मी गुंड होत असेल तर शेतकऱ्यांसाठी दहा वेळा गुंड होण्यास तयार आहे. सगळयात महत्वाचा प्रश्न माझा शेतकरी जगला पाहिजे असे लंके म्हणाले.
स्त्रोत.सोशल मिडिया.
त्यांची हुशारी आणि माझा खमकेपणा पुढील काळात शेतकऱ्यांसाठी नक्की कामाला येईल.
तर आमची शोलेची दोस्ती ! नगर दक्षिण लोकसभेचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी आज राहुरी येथील सभेत आमदार प्राजक्त तनपुरे आपले मार्गदर्शक असून त्यांची हुशारी आणि माझा खमकेपणा पुढील काळात शेतकऱ्यांसाठी नक्की कामाला येईल , असे म्हणत आमची शोलेची दोस्ती आहे असे म्हणताच प्रचार सभेतील उपस्थित हजारो लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यास दाद दिली.