मुंबईतील ५० हून अधिक रुग्णालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी, बीएमसी मुख्यालय आणि विद्यालयांना सुद्धा धमकीचे ईमेल….
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | MUMBAI | MUMBAI POLICE | HOSPITALS | COLLEGES | BMC HEADQUARTERS | BOMB THREAT EMAILS | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
मुंबईतील ५० हून अधिक रुग्णालयांमध्ये धमकीचा मेल आला आहे. मुंबईतील ५० हून अधिक रुग्णालयांना बॉम्बने उडवण्याच्या धमकीचे मेल पाठवण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील अनेक प्रसिद्ध रुग्णालयांमध्ये धमकीचे ईमेल आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईमेल पाठवणाऱ्याने रुग्णालयांच्या बेड आणि बाथरूमच्या खाली बॉम्ब ठेवून रुग्णालय उडवण्याची धमकी दिली आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार धमकीचा ईमेल पाठवणाऱ्याने आपली ओळख लपवण्यासाठी व्हीपीएन नेटवर्कचा वापर करून सर्व ईमेल पाठवले आहेत. हा ईमेल मुंबईतील जसलोक हॉस्पिटल, रहेजा हॉस्पिटल, सेव्हन हिल हॉस्पिटल, कोहिनूर हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, जेजे हॉस्पिटल, सेंट जॉर्ज हॉस्पिटल आणि अन्य हॉस्पिटलमध्ये आल्याचीही माहिती सूत्रांनी म्हटले आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
मुंबईतील अनेक नामांकित ५० रुग्णालयांना धमकीचा ईमेल….
एका अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती देताना सांगितले आहे की एकाच ईमेलमध्ये लिहिलेला हा धमकीचा ईमेल ५० हून अधिक रुग्णालयांना पाठवण्यात आला आहे. रुग्णालयांना धमकीचा ईमेल मिळताच त्यांनी पोलिसांना कळवले आहे. यानंतर पोलीस आणि बॉम्ब निकामी पथकाने रुग्णालयात जाऊन तपासणी केली असता पोलिसांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही. मुंबई पोलिसांना प्राथमिक तपासानंतर मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील अनेक नामांकित रुग्णालयांना त्यांच्या ईमेल आयडीवर हा धमकीचा ईमेल आला आहे आणि धमकीचा ईमेल बीबल डॉट कॉम नावाच्या वेबसाइटचा वापर करून पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की धमकीचा ईमेल पाठवणारी व्यक्ती अद्याप सापडलेली नाही. धमकीचा ईमेल पाठवण्यामागचा हेतू काय होता ? याचा पोलीस सध्या शोध घेत आहेत.
स्त्रोत मिडिया सोशल
बीएमसी मुख्यालयालाही धमकीचा ईमेल…..
मुंबईतील रुग्णालयांपाठोपाठ आता महाविद्यालयांनाही धमकीचे ईमेल आले आहेत. मुंबईच्या हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये धमकीचा ईमेल आला आहे. ईमेल करणाऱ्याने कॉलेज बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे. धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर कॉलेज प्रशासनाने जवळच्या पोलिस स्टेशनला यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यानंतर स्थानिक पोलिस आणि बॉम्बशोधक पथकाचे अधिकारी आले आणि त्यांनी तपास केला पण काहीही संशयास्पद आढळले नाही. मुंबईचे व्हीपी रोड पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मुंबईतील रुग्णालय आणि महाविद्यालयानंतर मुंबईतील बीएमसी मुख्यालयाला धमकीचा ईमेल आला आहे. ईमेलद्वारे मुख्यालय उडवून देण्याची धमकी दिली आहे. पोलिसांनी बीएमसीच्या मुख्यालयात तपास केला पण त्यात काहीही संशयास्पद आढळले नाही. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.