गेल्या महिन्याभरात बॉलिवुड अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या येत आहे. यातल्या काही धमक्या फक्त खोडसाळपणा असल्याचं स्पष्ट झालं असलं तरी काही बाबतीत मुंबई पोलीस सखोल तपास करून धमकी देणाऱ्यांचा मार्ग काढत आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीमुळे मुंबई पोलिसांची चिंता वाढली आहे. यासंदर्भात वरळी पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस नेते बाबा सिद्दिकी यांची गेल्या महिन्यात दोन व्यक्तींनी गोळ्या घालून हत्या केली होती. नंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारली. तसेच आपला रोख सलमान खानच्या दिशेनं असल्याचंही बिश्नोई गँगकडून स्पष्ट करण्यात आलं. यासंदर्भातली एक पोस्ट सोशल मीडियावर करण्यता आली होती. ती पोस्ट करणाऱ्यालाही पोलिसांनी नंतर अटक केली. जीव वाचवायचा असेल तर बिश्नोई गँगच्या अटी मान्य करण्याचाही अल्टिमेटम त्यात देण्यात आला होता. तेव्हापासून सलमान खानला सातत्याने अशा धमक्या येत असून त्या लॉरेन्स बिश्नोई गँगकडून येत असल्याचं बोललं जात आहे.

delhi girl slap salman khan in publicly actor did this in anger | जब सलमान खान को दिल्ली की लड़की ने सरेआम मार दिया था थप्पड़, गुस्से में एक्टर ने कर दिया(संग्रहित दृश्य.)

नव्याने आलेल्या धमकीमागेही लॉरेन्स बिश्नोई गँग….

 अभिनेता सलमान खानला नव्याने आलेल्या धमकीमागेही लॉरेन्स बिश्नोई गँग असल्याची प्राथमिक माहिती आहे. गुरुवारी रात्री मुंबईच्या वाहतूक शाखेला हा धमकीचा मेसेज मिळाला. त्यात लॉरेन्स बिश्नोई गँगचा उल्लेख असल्याचंही बोललं जात आहे. यासंदर्भात वरळी पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याबाबत सविस्तर तपास सुरू करण्यात आला आहे. अशी माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.  बिश्नोई गँगचा म्होरक्या लॉरेन्स बिश्नोई हा गुजरातमधील तुरुंगात आहे. पण तो तुरुंगातून त्याची गँग चालवतो व कारवायांचं नियोजन करून त्या पूर्ण करण्याचे आदेशही देतो असे दावे केले जात आहेत. यासंदर्भात बिश्नोईचा तुरुंगातून केलेला एक व्हिडिओ कॉलही मध्यंतरी व्हायरल झाला होता. दुसरीकडे लॉरेन्सचा भाई अनमोल बिश्नोई हा अमेरिकेत असल्याची माहिती समोर आली असून त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकारने पावलं उचलायला सुरुवातही केली आहे. लॉरेन्स तुरुंगात असताना त्याचा भाऊ बाहेर राहून गँगच्या गुन्हेगारी कृत्यांचं नियोजन करत असल्याचं सांगितलं जात आहे.