चित्रपटांच्या चित्रीकरणाच्या नावाखाली मुंबई येथे अनेक लोकांची फसवणूक होते. काहींची आर्थिक तर काहींची शाररीक फसवणूक होते.मोठमोठ्या अभिनेत्यांसोबत संबंध असल्याचे भासावून काही फसवतात तर काही निर्मात्यांची नावे सांगून फसवणूक करतात. तशीच एक घटना पालघर जिल्ह्यात घडली आहे.एक १८ वर्षांची पीडित तरुणी अभिनेत्री बनण्यासाठी मुंबईत आली होती. ती सध्या वसईत राहते. सिनेमात काम मिळविण्यासाठी ती विविध निर्मीती कंपन्यांकडे (प्रॉडक्शन हाऊस) भेटी देत होती. दरम्यान १ नोव्हेंबर रोजी तिला एका कंपनीतून दूरध्वनी आला होता. आम्ही नवीन बेवसिरीज तयार करत असून त्यासाठी मुलाखत (ऑडीशन) देण्यासाठी या तरुणीला बोलावले. २ नोव्हेंबर रोजी पीडित तरूणी अर्नाळा येथे गेली.तिथे तिला एक दिग्दर्शनक, एक कॅमेरामन, एक अभिनेता आणि एक महिला मेकअप आर्टीस्ट असे ४ जण भेटले. चौघांनी तिला एका एका लॉज मध्ये ऑडीशनसाठी नेले. तिथे तिला काही दृश्ये चित्रित करायची आहेत असे सांगून तिला फसवून अश्लील कृत्य करण्यास भाग पाडले. ही दृ्श्ये केवळ ऑडीशनचा भाग असून तिचा कुठे वापर केला जात नांही. सिनेसृष्टीत असं कराव लागते असे तिला सांगितले.चित्रपटांसाठी ऑडिशन देण्याच्या बहाण्याने महिलांचे नग्न व्हिडिओ शूट केल्याप्रकरणी एका महिलेसह तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
पीडित तरुणीची दृश्ये विविध अश्लील संकेतस्थळावर प्रसारीत केल्या जाणार्या वेबसिरीज मध्ये टाकण्यात आल्याची माहिती तिला परिचितांकडून मिळाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तिने अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनयिमाच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण पुढील तपासासाठी गुन्हे शाखा ३ कडे वर्ग करण्यात आले आहे. याप्रकरणी तांत्रिक तपास करून अनुजकुमार जैस्वाल (३०), सर्जू कुमार विश्वकर्मा (२५) तसे ३३ वर्षीय महिला आरोपी यांना अटक करण्यात आली.