By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप करून सागर बंगल्यावर निघालेले जरांगे पुन्हा आंतरवलीत, आंदोलकांना मागे फिरण्याचं आवाहन….
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > महाराष्ट्र > गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप करून सागर बंगल्यावर निघालेले जरांगे पुन्हा आंतरवलीत, आंदोलकांना मागे फिरण्याचं आवाहन….
महाराष्ट्र

गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप करून सागर बंगल्यावर निघालेले जरांगे पुन्हा आंतरवलीत, आंदोलकांना मागे फिरण्याचं आवाहन….

TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | HOME MINISTER DEVENDRA FADNAVIS MARATHA PROTESTER MANOJ JARANGE | ANTARWALI SARATI TALUKA | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/02/26 at 10:49 AM
By BHAIYYASAHEB BOXER 4 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

मुंबईला निघालेले मनोज जरांगे यांनी सगळ्या मराठा बांधवांना आपल्या आपल्या गावांमध्ये परतण्याचं आवाहन केलं आहे. आम्हाला कायद्याचं पालन करायचं आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. अंबडमध्ये संचारबंदी लावण्यात आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मागे फिरण्याचा निर्णय घेतला आहे. शहाणी भूमिका घेऊन परत जातो आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे यांनी भंबेरी गावातून आंतरवाली सराटीमध्ये परतले आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने शांत रहावं असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. संचारबंदी लागल्याने आपल्याला मुंबईला जाता आलेलं नाही. राज्यभरातल्या सगळ्या मराठा बांधवांनी शांत राहिलं पाहिजे असं आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Maharashtra govt delegation to meet Jarange-Patil today to prevent his  Mumbai march for Maratha quota - मुंबई की ओर कूच करने जा रहे मनोज जरांगे,  शिंदे ने भेजा विधायक और अधिकारी; 26स्त्रोत.सोशल मिडिया.

जरांगे यांचं शांततेचं आवाहन

आपल्याला सगळ्या गोष्टी शांततेत करायच्या आहेत. आपण शांत राहून आंदोलन करुन ज्या गोष्टी हव्या आहेत त्या मिळवू. आत्ता मी एकटा पुरेसा आहे. कुणीही या ठिकाणी थांबू नका आपल्या आपल्या गाड्या घ्या आणि गावाला परत जा  असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून इथून लवकर निघा. आपल्याला सगळ्या गोष्टी शांततेत करायच्या आहेत असंही जरांगे म्हणाले. 

संचारबंदी का उल्लंघन कर बर्थडे मनाया :8 पर केस दर्जस्त्रोत.सोशल मिडिया.

अंबड तालुक्यात संचारबंदी

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी तसेच जरांगे यांनी मुंबईला जावू नये याकरीता आग्रही असल्याने अंतरवाली सराटी येथे मोठया प्रमाणात गर्दी जमण्याची शक्यता असून, त्यामुळे धुळे – सोलापूर राष्ट्रीय महामार्ग व तालुक्यातील इतर मार्गावर मोठया प्रमाणावर गर्दी जमून दळणवळण विस्कळीत होण्याची, सर्वसामान्य जनतेचे जनजीवन विस्कळीत होण्याची, गर्दीमुळे सार्वजनिक शांतता बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने अंबड तालुक्यात संचारबंदीचे आदेश लागू करण्याच्या निर्णय घेण्यात आला. सदरील संचारबंदी आदेश दुकाने, आस्थापना यांनाही लागू राहतील. कोणत्याही प्रकारचे शस्त्र, ज्वलनशील पदार्थ, स्फोटके सोबत बाळगता येणार नाहीत हे स्पष्ट करण्यात आलं. ज्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मागे फिरण्याचा निर्णय घेतला.

Manoj Jarange | खुमखुमी असेल तर फडणवीस यांनी समोर यावे...मनोज जरांगे यांचे  आव्हान - Marathi News | Maratha reservation leader Manoj Jarange Patil  challenged BJP leader Devendra Fadnavis marathi news ...स्त्रोत.सोशल मिडिया.

जरांगे काय म्हणाले होते?

माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातोय. यामागे देवेंद्र फडणवीस आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या मनात आले तर राज्यात काहीच होऊ शकत नाही. फडणवीसांचं न ऐकल्यावर काय होतं ते तुम्हाला सांगतो. जो माणूस स्वत:चा पक्ष कधीच सोडू शकत नाही अशा लोकांवर फडणवीसांमुळे भाजपा सोडण्याची वेळ आली एकनाथ खडसे  यांच्यावर फडणवीसांमुळे भाजपा सोडण्याची वेळ आली असेही जरांगे म्हणाले. विनोद तावडे महाराष्ट्रातून कधीच बाहेर जाणार नव्हते. मात्र त्यांना दिल्लीला जावे लागले. नाना पटोले यांनादेखील फडणवीसांमुळे भाजपा सोडून जावे लागले. पंकजा मुंडे आयुष्यातही भाजपा सोडण्याचा विचार करू शकत नाहीत. मात्र भाजपात त्यांची घुसमट होत आहे. फडणवीस हे महादेव जानकर यांना धनगरांचा नेता म्हणून मोठं होऊ देत नाहीयेत असे जरांगे म्हणाले.

Devendra Fadnavis Thanked Manoj Jarange Patil Maratha Reservation | उपोषण  मागे घेतल्याबद्दल फडणवीसांनी मानले मनोज जरांगे पाटील यांचे आभार: म्हणाले  माजी न्यायमूर्तींचेही बहुमूल्य सहकार्य - Maharashtra News | Divya Marathiस्त्रोत.सोशल मिडिया.

“ब्राह्मणी कावा थांबवला नाही तर…”

एकजूट झालेल्या मराठ्यांशी फडणवीस  काय करू पाहतायत हे मला तुम्हाला सांगायचे आहे. कारण मला ही माहिती फडणवीसांच्या जवळच्या लोकांनी सांगितली. माझ्याविरोधात फडणवीस बदनामीचे षडयंत्र वापरतील. फडणवीसांमुळे अनेकांना भाजपा सोडण्याची वेळ आली. मी ज्या लोकांची नावे घेत आहे त्यांनी हे सगळं मान्य करायला हवं. ब्राह्मणी कावा मी माझ्याविरोधात चालू देणार नाही. मनोज जरांगे हे मराठ्याचं पोर आहे. हा ब्राह्मणी कावा जर नाही थांबवला तर मी माझं नाव बदलतो असं मनोज जरांगे देवेंद्र फडणवीसांना उद्देशून म्हणाले. तसेच मी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पायी जाणार आहे. मी रस्त्यात मेलो तर मला फडणवीसांच्या सागर बंगल्यासमोर नेऊन टाका असे आवाहन त्यांनी मराठा आंदोलकांना केले.

You Might Also Like

२५०० कोटींची फसवणूक,महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा ; २९ लाख ८७ हजार ४२२ गुंतवणूकदार, ५६आरोपी अन् ३१ गुन्हे,गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले…..

डॉक्टरची कोरोना काळातील ऑडिओ क्लिप व्हायरल ; म्हणाले पेशंटला मारुन टाक की, कशाला ठेवलेय उगीच ? ऑक्सिजन जास्त लागतोय, तुम्हाला…

हगवणे पिता-पुत्रास पाच दिवसांची पोलीस कोठडी ; भाजपच्या महिला आक्रमक, आरोपींवर फेकले टोमॅटो.

वैष्णवीचं दहा महिन्यांचं बाळ घेऊन निलेश चव्हाण फरार ? बंदूकधारी चव्हाणकडे सध्या हे बाळ आहे. मात्र वारंवार बंदुकीला हात लावून तुमचा अन बाळाचा काही संबंध नाही म्हणत……

अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार?

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love2
Sad0
Happy1
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article नगर-मनमाड रस्त्यावर वाहनांची धडक, आमदार संग्राम जगताप यांच्या सतर्कतेने वाद टळला. रिक्षाचालकाला नुकसान भरपाई.
Next Article केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची एन्ट्री झाली अन् खुर्च्या खाली….. गडकरींच्या स्वागताला बोटांवर मोजण्या इतकेच …..
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?