By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: पंकजा मुंडेंचा पराभव न सहन झाल्याने “मला आता कोणाचीच गरज नाही, मला फक्त ताईचीच गरज होती” असे म्हणत एका कार्यकर्त्याची आत्महत्त्या…
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > महाराष्ट्र > पंकजा मुंडेंचा पराभव न सहन झाल्याने “मला आता कोणाचीच गरज नाही, मला फक्त ताईचीच गरज होती” असे म्हणत एका कार्यकर्त्याची आत्महत्त्या…
महाराष्ट्र

पंकजा मुंडेंचा पराभव न सहन झाल्याने “मला आता कोणाचीच गरज नाही, मला फक्त ताईचीच गरज होती” असे म्हणत एका कार्यकर्त्याची आत्महत्त्या…

TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | BEED | BJP LEADER PANKAJA MUNDE | A WORKER IN BEED COMMITS SUICIDE DUE TO PANKAJA MUNDE'S DEFEAT IN SOUTH LOK SABHA ELECTIONS | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/06/10 at 7:50 PM
By BHAIYYASAHEB BOXER 4 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR 

बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांनी पराभव केला आहे. पंकजा मुंडेंचा हा पराभव जिव्हारी लागल्याने त्यांचा कार्यकर्ता पांडुरंग सोनवणे यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि आई-वडील असे कुटुंब असल्याने त्यांची जबाबदारी आता पंकजा मुंडेंनी उचलावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.  पांडुरंग सोनवणे हे बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील डीघोळ आंबा गावातील होते. दरम्यान पंकजा मुंडे  यांचा पराभव झाल्याने ते नैराश्येत गेले होते, अशी प्रतिक्रिया आई सरूबाई सोनवणे यांनी दिली आहे. “आम्ही एवढे तिच्यामागे फिरून आमचा उपयोग काय झाला ? मग आमच्या जीवनात काही उपयोग राहिला नाही, असे तो म्हणत होता. शेवटी आम्ही त्याला रुग्णालयात दाखल केले. तो वेड्यासारखा करू लागला. त्यांचा फोटो घेऊन रडायचा. दवाखान्यात ११ वाजेपर्यंत राहिला. मला जगायचच नाही असे तो म्हणत होता. मला आत्महत्याच करायची आहे, असे म्हणत नाकात नळी असताना पळून आला. मला आता कोणाचीच गरज नाही, मला ताईचीच गरज होती, असे तो म्हणाला. रुग्णालयातून आल्यावर तसाच शेतात गेला. आम्ही येण्याआधीच त्याने शेतात जाऊन आत्महत्या केली”, असं मृत कार्यकर्त्याच्या आईने सांगितले आहे.

धनंजय मुंडे म्हणाले 'आम्ही आता आम्ही भाऊ-बहीण नाही', पंकजा मुंडेंनी दिलं  उत्तर, म्हणाल्या "रक्ताचं नातं..." | BJP Pankaja Munde on Dhananjay Munde  statement over ...स्त्रोत सोशल मिडिया 

मृत कार्यकर्त्याचे पंकजा आणि धनंजय मुंडेंवर नितांत प्रेम….

मृत कार्यकर्ता पांडुरंग सोनवणे यांच्या मुलाच्या नावावर सहा गुंठे आणि वडिलांच्या नावावर २७ गुंठे जमीन आहे. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे, अशी माहितीही त्यांच्या आईने दिली आहे. दरम्यान, कार्यकर्त्याने आत्महत्या केल्यावर पंकजा मुंडेच्या कार्यालयातून कोणाचे फोन आले का असे विचारल्यावर त्या म्हणाल्या, “कालपासून कोणाचा फोन वगैरे आलेला नाही. पण त्याच्या लेकराच्या भविष्याची जबाबदारी त्यांनी घ्यावी. त्याची बायको आणि आम्ही म्हातारे-म्हातारी आमची काळजी घ्यावी. आमची प्रॉपर्टी नाही. त्यामुळे आमच्यावर लक्ष देऊन सांभाळावं”, अशी विनंतही त्यांनी केली आहे. यावेळी गावकऱ्यांशीही संवाद साधण्यात आला. गावकरी म्हणाले की, पांडुरंग सोनवणेंचे पंकजा आणि धनंजय मुंडेंवर नितांत प्रेम होते. ४ जूनचा निकाल लागल्यानंतर मी उसतोड कामगार, आता माझं खरं नाही असे म्हणत तो नैराश्येत गेला होता. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल केले होते. दाखल केल्यानंतर तो एक दिवस दवाखान्यात राहिला. सकाळी स्टँण्डवर आला. ताईंचा फोटो दाखवून रडायला लागला. माझ्या घरासमोर भाजपाची मीटिंग आहे असे सांगून शेताच्या दिशेने गेला आणि शेतात जाऊन आत्महत्या केली.”

Pankaja Munde-Beed News | Lok Sabha Election 2024स्त्रोत सोशल मिडिया

पंकजा मुंडेंचे  एक्सवर पोस्ट करून कार्यकर्त्यांना आवाहन….

ताईंचा अजून फोन आलेला नाही. आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की तो भाजपाचा कार्यकर्ता होता. त्याचे कुटुंब रस्त्यावर येण्यापेक्षा त्याच्या लेकराबाळांची जबाबदारी घेऊन ताईंनी मदत करावी, अशी आमच्या ग्रामस्थांची मागणी आहे”, असे एका ग्रामस्थाने सांगितले आहे. दरम्यान, या आत्महत्येची दखल पंकजा मुंडे यांनीही घेतली आहे. त्यांनी याबाबत एक्सवर पोस्ट करून कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. “स्वतः च्या जीवाला धक्का तोच लावेल ज्याला माझ्यावर प्रेम किंवा श्रद्धा नाही. मी लढत आहे, संयम ठेवत आहे, तुम्हीही सकारात्मकता दाखवा आणि संयमाने रहा. कोणी माझ्यासाठी जीव देणे कळतेय का किती कठीण आहे माझ्यासाठी ? मला प्रचंड अपराधी आणि दुःखी वाटत आहे. मी स्वीकारला आणि पचवला आहे पराभव, तुम्हीही पचवा!! अंधारी रात्रीनंतर सुंदर प्रकाश असतो. तुम्ही माझ्या जीवनातील प्रकाश आहात. शांत व सकारात्मक रहा”, असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

You Might Also Like

२५०० कोटींची फसवणूक,महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा ; २९ लाख ८७ हजार ४२२ गुंतवणूकदार, ५६आरोपी अन् ३१ गुन्हे,गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले…..

डॉक्टरची कोरोना काळातील ऑडिओ क्लिप व्हायरल ; म्हणाले पेशंटला मारुन टाक की, कशाला ठेवलेय उगीच ? ऑक्सिजन जास्त लागतोय, तुम्हाला…

हगवणे पिता-पुत्रास पाच दिवसांची पोलीस कोठडी ; भाजपच्या महिला आक्रमक, आरोपींवर फेकले टोमॅटो.

वैष्णवीचं दहा महिन्यांचं बाळ घेऊन निलेश चव्हाण फरार ? बंदूकधारी चव्हाणकडे सध्या हे बाळ आहे. मात्र वारंवार बंदुकीला हात लावून तुमचा अन बाळाचा काही संबंध नाही म्हणत……

अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार?

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad1
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article जामखेडमध्ये भीषण अपघात तीन जणांचा जागीच मृत्यू तर दोघे गंभीर जखमी, कार मधील सर्व नगरमधील एमआयडीसी परिसरातील….
Next Article मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे यांचे कठोर उपोषण, प्रकृती चिंताजनक, उपचार घेण्यास नकार….
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?